Dunki Twitter Review : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे लाखो चाहते आहेत. यंदाच्या वर्षी त्याचे पठाण आणि जवान हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडे चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर आज त्याचा डंकी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याच्या या चित्रपटात शाहरुखनं हार्डी ही भूमिरका साकारली आहे. या चित्रपटाट परदेशात पोहोचण्यासाठी किती भयानक गोष्टींचा सामना करावा लागतो, याविषयी सांगण्यात आलं आहे. या चित्रपटात तापसी पन्नू त्याची प्रेमिका दाखवण्यात आली आहे. दरम्यान, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. फिल्म क्रिटिक्ससाठी या चित्रपटाची स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आली होती. त्यात राजकुमार हिरानी यांच्या या चित्रपटाला पाच स्टार देण्यात आले. शाहरुख खाननं अभिनेता म्हणून खूप चांगले काम केले. नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाचा पहिला भाग हा शाहरुख खान आणि त्याचे मित्र लंडनच्या दिशेनं प्रवास करण्यावर आधारीत आहे. तर कॉमेडी, रोमान्स, प्रेम आणि मैत्रीवर आधारीत आहे. तर नेटकरी रिव्ह्यू देत स्तुती करत आहेत. 




एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की 'एका ओळीत जर रिव्ह्यू द्यायचा असेल तर मास्टरपिस आणि पाच स्टार दिले आहेत. डंकी आजवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये एक बेस्ट इमोश्नल कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटातील सगळ्याच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. सुरुवातीला तुम्हाला खूप हसायला येईन आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे अश्रु अनावर होतील.' दुसरा एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'डंकी ब्लॉकबस्टर आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, '2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक अॅक्शन चित्रपट झाल्यानंतर डंकी हा चित्रपट एका नव्या आणि फ्रेश पद्धतीनं आला आहे. स्ट्रॉंग, भावनात्मक, संदेश देणारा हा चित्रपट... मनात असलेल्या कहाण्या. इतर लोकांना देखील आवडतील.' 



हेही वाचा : जॉर्जिया एंड्रियानीसोबतच्या ब्रेकअपनंतर अरबाज पुन्हा रिलेशनशिमध्ये! पाहा कोण आहे त्याची नवीन Girlfriend



शाहरुखची पत्नी गौरी खान आणि धाकटा मुलगा अरबाजनं काय प्रतिक्रिया दिली याविषयी देखील अभिनेत्यानं सोशल मीडियावर सांगितलं. खरंतर शाहरुखनं सोशल मीडियावरून त्याच्या चाहत्यांशी संपर्क साधला तर त्यावेळी एका चाहत्यानं त्याला गौरीला हा चित्रपट कसा वाटला हे विचारलं त्यावर उत्तर देत शाहरुख म्हणाला की 'हा असा चित्रपट आहे ज्यावर कोणालाही गर्व होईल. तिला चित्रपटातील ह्युमर खूप आवडला आहे.' दुसऱ्यानं अरबाजला हा चित्रपट पाहण्यासाठी कधी घेऊन जाणार? शाहरुख म्हणाला की 'त्यानं हा चित्रपट पाहिला आणि तो पूर्णवेळ गाणं गातो मला लॅव्होटरी जायचं आहे.'