जॉर्जिया एंड्रियानीसोबतच्या ब्रेकअपनंतर अरबाज पुन्हा रिलेशनशिमध्ये! पाहा कोण आहे त्याची नवीन Girlfriend

Arbaaz Khan in a relationship : अरबाज खानचा काही दिवसांपूर्वीच जॉर्जिया एंड्रियानीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एन्ट्री झाल्याचं म्हटलं जातं. 

दिक्षा पाटील | Updated: Dec 21, 2023, 12:16 PM IST
जॉर्जिया एंड्रियानीसोबतच्या ब्रेकअपनंतर अरबाज पुन्हा रिलेशनशिमध्ये! पाहा कोण आहे त्याची नवीन Girlfriend title=
(Photo Credit : Social Media)

Arbaaz Khan in a relationship : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा भाऊ अरबाज खानला पुन्हा प्रेमात धोका मिळालाय. या ब्रेकअपची घोषणा खुद्द त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी हिने काही दिवसांपूर्वी केली होती . पण या ब्रेकअपची चर्चा सुरु असतानाच अरबाजच्या आयुष्यात नव्या मुलीने एंट्री केलीय. 

अरबाज खान 1998 मध्ये मलायकासोबत लग्नबंधनात अडकला. त्यानंतर 2016 मध्ये त्यानं मलायकाला घटस्फोट दिला. या सगळ्यात मलायकानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज हा जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा या त्या दोघांनी वाढदिवसाच्या दिवशी केक कट केल्यानंतर सुरु झाली होती. काही महिन्यांनंतर अरबाजनं 2019 मध्ये त्यांच्या नात्याची पुष्टी केली. काही दिवसांपूर्वी अरबाजच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या होत्या. खरंतर जॉर्जिया एंड्रियानीनं एका मुलाखतीत तिच्या आणि अरबाजच्या ब्रेकअपवर स्पष्टपण वक्तव्य केलं. आता रिपोर्ट्सनुसार बोलायचे झाले तर अरबाज खानच्या आयुष्यात पुन्हाल एकदा प्रेमाची एन्ट्री झाली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रिपोर्ट्सनुसार, अरबाज खान हा बॉलिवूड मेकअप आर्टिस्ट शूरा खानला डेट करत आहे. त्याच्या एका जवळच्या व्यक्तीनं ही माहिती दिल्याचं म्हटलं जाते. इतकंच नाही तर ते दोघं त्यांच्या नात्याविषयी खूप सीरिअस आहेत आणि लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे, असे म्हटले आहे.  असं म्हटलं जातं की त्या दोघांची पहिली भेट ही आगामी चित्रपट पटना शुक्लाच्या सेटवर झाला होता. तर हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. शूरा खान ही बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची लेक राशा थडानीची मेकअप आर्टिस्ट आहे. 

हेही वाचा : 'पक्ष बदलत राहतील, पण हा देश टिकून राहिला पाहिजे'; 'मैं अटल हूं' चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित

दरम्यान, पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत अरबाज खान आणि मलायका अरोराच्या नात्यावर बोलताना जॉर्जिया म्हणाली होती की, 'त्याचा माझ्या बॉन्डवर कोणताही परिणाम होत नाही. त्याचं मलायकासोबत जे नातं होतं, ते माझ्या नात्याच्यामध्ये कधीच आलं नव्हतं. त्यांचं नातं आधीच संपलं होतं. असं समजा की याला दोन वर्षे झालेत, पण खऱ्या आयुष्यात त्यांचा घटस्फोट त्याच्या एक- दीड वर्ष आधीच झाला होता.' तर अरबाज आणि मलायका घटस्फोटानंतर एकत्र मिळून मुलाचा सांभाळ करत आहेत. या सगळ्यात आता खरंच अरबाज पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये आला आहे की नाही याविषयी त्यानं किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं माहिती दिलेली नाही.