मुंबई : विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली नाही. तर, थेट ही जोडी लग्नबंधनात अडकूनच सर्वांसमोर येणार आहे. सुरुवातीला त्यांच्या लग्नाच्या चर्चा म्हणजे अफवा असल्याचं म्हटलं गेलं. पण, त्यानंतर मात्र सर्व माहिती समोर आली. विकी आणि कतरिनाचं ठरलं हो.... अशीच आरोळी चाहत्यांनी फोडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वत्र या जोडीला शुभेच्छाच देण्याचं सत्र सुरु असताना आता एका सदिच्छेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 


बरं, शुभेच्छाही अशा, ज्या पाहून हसू थांबवता येणंही कठीण. सोशल मीडियावर ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.


ही पोस्ट आहे ड्यूरेक्स, या Condom ब्रँडची. 'प्रिय विकी आणि कतरिना, तुम्ही आम्हाला बोलवलं नाही म्हणजे तुम्ही नक्कीच थट्टा करत आहात.' असं या पोस्टमध्ये लिहिलं गेलं आहे. 


सध्या ही पोस्ट कमालीची व्हायरल होत आहे. विकी आणि कतरिनानं त्यांच्या विवाहसोहळ्यासाठी अत्यंत मोजक्या पाहुण्यांना बोलवलं आहे. 




कोरोना नियम आणि कमीत कमी माणसांतच लग्न करण्याची इच्छा पाहता आता या विवाहसोहळ्यासाठी नेमकी कोणाची उपस्थिती असणार हे पाहणंच औत्सुक्याचं ठरेल. तुर्तास ही जाहिरात आणि त्यानिमित्तानं सुरु असणाऱ्या चर्चांचाच चाहते आनंद घेत आहेत.