मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरशद वारसी आणि भूमी पेडणेकर स्टारर फिल्म 'दुर्गावती'चा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित झाला. या अगोदर ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ इंडियाच्या यूट्यूब चॅनलवर याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. तीन मिनिट आणि २० सेकेंदाचा हा ट्रेलर खूप थ्रिलिंग आहे. या ट्रेलरमधून गोष्टीचा उलगडा होत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमात भूमी पेडणेकर IAS अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. जी अशोक यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'भागमती' हा तमिळ, तेलुगू भाषेतील सिनेमाचा रिमेक आहे. त्या सिनेमांत अनुष्का शेट्टी लीड रोलमध्ये होती. 



 ११ डिसेंबरला हा सिनेमा ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. ट्रेलरमध्ये अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे भीती निर्माण होऊ शकते. या सिनेमाची कथा राजकारणावर अवलंबून आहे. चंचल चौहान म्हणजे भूमी पेडणेकर या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे.


काही दिवसांपूर्वी भूमिने या सिनेमाचं पोस्टर स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलं होतं. या आधी सिनेमाचं नाव फक्त ‘दुर्गामती’ असं ठेवण्यात आलं होतं. आता ते बदलून दुर्गामती: द मिथ असं ठेवण्यात आलं आहे. मुळ चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये अनुष्का शेट्टी झळकली होती. यामध्ये अनुष्का शेट्टी आयएएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती तिच्यामध्ये राणी नावाच्या तरुणीचा आत्मा तिच्या अंगात शिरतो. असं दाखवण्यात आलं होतं.