मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि उद्योजक सचिन जोशीला ईडीकडून (ED Arrested Sachon Joshi)  अटक करण्यात आली आहे. ओमकार रिअ‍ॅल्टर्स प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.  ओमकार ग्रुप प्रमोटर्स आणि सचिन जोशीकडून करण्यात आलेल्या १०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अटकेची कारवाई करण्याआधी सचिन जोशीची १८ तास चौकशी करण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रसिद्ध सिने कलाकार निर्माता आणि व्यावसायिक असलेला सचिन जोशीला सक्त वसुली संचालनालयाने अटक केली आहे. मनीं लोंदरिंग प्रकरणात सचिन जोशी याला ईडी ने अटक केली आहे. 1000 करोडच्या आर्थिक गैरव्यवहारा बाबत अटक करण्यात आली आहे. तसेच सचिन जोशी याला आज न्यायल्यात हजर केले जाणार आहे. 



सचिन जोशीने 2017 साली विजय माल्याच्या गोव्यातील 'किंगफिशर' बंगला खरेदी केला होता. सचिन जोशी JMJ ग्रुपचे प्रमोटर देखील असून त्यांनी पान मसाला, परफ्यूम, द्रव्य पदार्थ आणि मद्याचा देखील व्यापार केला आहे. सचिन जोशी प्लेबॉय (रेस्टॉरंट आणि क्लब चेन)चे भारतीय फ्रेंचाइजीचे मालक आहेत. त्याचं लग्न मॉडेल आणि अभिनेत्री उर्वशी शर्मासोबत केलं आहे. ईडीकडून पाठवण्यात आलेल्या समन्सनंतर सचिन जोशी ईडीसमोर सादर झाले नव्हते. त्यामुळे शनिवारी सचिन यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आलं. 


याचप्रकारे टॉप्स ग्रुप प्रकरणात बॉलिवूड अभिनेता राज कपूर यांचा नातू अरमान जैनला देखील ईडीने दुसऱ्यांदा समन्स पाठवला आहे. याअगोदर ईडीने अरमानच्या घरी बुधवारी छापा मारला होता आणि गुरूवारी दाखल होण्यास सांगितलं. या प्रकरणात अरमान जैन (Armaan Jain) यांचं नाव शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचा मुलगा विहंग सरनाईक (Vihang Sarnaik) सोबत जोडलं गेलं आहे. या प्रकरणात विहंगची देखील चौकशी सुरू आहे. विहंगच्या फोनचा डेटा ED अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी घेतला आहे. या दरम्यान अशा काही गोष्टी समोर आल्या ज्यामुळे तपास वाढविण्यात आला आहे. ED ने यानंतर अरमानच्या घरी छापा घातला असून आता समन्स पाठवण्यात आली आहे.