मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानला ईडीनं समन्स पाठवलाय. कोलकाता नाईट रायडर्सच्या फेमा केसप्रकरणी २३ ऑगस्टला शाहरूखला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश ईडीनं दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॉरिशअसच्या एका कंपनीला शाहरूखच्या केआरएसपीएल या कंपनीनं बाजारमुल्यापेक्षा कमी दरानं शेअर विकल्यामुळं तब्बल ७३ कोटींचं सरकारचं नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय.


शाहरूखची पत्नी गौरी खान ही केआरएसपीएलची संचालिका आहे. तर शाहरूख आणि जुही चावला हे कोलकाता नाईट रायडर्स या आयपीएल टीमचे मालक आहेत. कोलकाता नाईट रायडर्सची टीम विकत घेण्यासाठी शाहरूखच्या रेड चिलीज एन्टरप्रायजेस या कंपनीनं स्पेशल परपज व्हेईकल म्हणून केआरएसपीएल म्हणजेच कोलकाता रायडर्स स्पोर्टस लिमिटेडची २००८मध्ये स्थापना केली होती.