मुंबई : बहुचर्चित असलेला जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरचा सिनेमा धडक बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करु शकला नाही. कसेबसे सिनेमाने आपले बजेट वसुल केले असले तरी सैराटसारखी जादू काही हा सिनेमा करु शकला नाही. धडकचे आठव्या दिवसाचे कलेक्शन काही जान्हवी-ईशानला फारसे सुखावणारे नाही. 


प्रेक्षकांना धडकला नाही 'धडक'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धडकचा ट्रेलर पाहुनच प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती. प्रदर्शनानंतर पहिले तीन दिवस धडक चांगली कमाई करत होता. पण त्यानंतर मात्र सिनेमाच्या कमाईचा आकडा सातत्याने पडला. म्हणजे जान्हवी-ईशानचा धडक काही प्रेक्षकांच्या मनाला भिडला नाही. 


आठव्या दिवशी केली इतकी कमाई


रिपोर्ट्सनुसार, आठव्या दिवशी धडकने एकूण ५४.५६ कोटींची कमाई केली. मराठी ब्लॉकबस्टर सिनेमा सैराटचा धडक हा हिंदी रिमेक आहे. ४ कोटीत बनवलेल्या सैराटने १०० कोटींची कमाई केली होती. तर ५० कोटी बजेट असलेल्या धडकने ५४ कोटी कमाई केली आहे. त्यामुळे सिनेमाचे कसेबसे आपले बजेट वसूल केले. पण काही खास कमाई करु शकला नाही. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करण्यात हा सिनेमा अपयशी ठरला. 
शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या साहेब बीवी और गॅंगस्टर मुळे धडकचे बॉक्स ऑफिसवर टिकणे खूप मुश्किल आहे.