मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध निर्माती एकता कपूरने तिच्या 'ट्रिपल एक्स-२' वेब सीरिजमधून वादग्रस्त सीन हटविले आहेत. वेब सीरिजच्या माध्यमातून भारतीय सैन्यांच्या कुटुंबाबद्दल चुकीची माहिती  पसरविण्याचा आरोप एकतावर करण्यात आला होता. या प्रकरणी तिच्या विरोधात गुरुग्रामच्या पालम विहार पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. छोट्या पडद्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता एकताने आपला मोर्चा डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळविला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु सध्या भारतीय जवानांच्या कुटुंबाबद्दल चूकीची माहिती पसरविल्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जेव्हा जवान सिमेवर देशाची रक्षा करत असतात तेव्हा त्यांच्या पत्नीचे  इतर पुरुषांसोबत अनैतिक संबंध असल्याचे सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. यावर खद्द एकताने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. 



'भारताचे नागरिक म्हणून आमच्या मनात भारतीय लष्कराबद्दल आदर आहे. आपले कल्याण आणि सुरक्षिततेसाठी त्यांचे योगदान अफाट आहे. वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलेले दृष्य आमच्याकडून केव्हाच हटवली गेली आहेत. तरी देखील मला ट्रोल केलं जात आहे. शिवाय काही जण आम्हाला धमक्या देखील देत आहे.' असं ती म्हणाली. 


दरम्यान युट्यूबवर प्रसिद्ध असलेल्या युट्युबर हिंदुस्तानी भाऊने एकता विरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. त्याने निर्माती एकता कपूर आणि आई शोभा कपूर विरोधात तक्रार दाखल केली आहे.