मुंबई : एकता कपूर ही मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. एक असा काळ होता, जेव्हा स्टार चॅनलवरती एकता कपुरचेच सिरियल्स पाहिले जायचे. तिच्या अनेक सिरियल्सनी घराघरात राज्य केलं आहे. यानंतर एकता कपूर वेब सिरीज बनवु लागली. त्या देखील लोकांना आवडू लागल्या. ज्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. परंतु आता एकता कपूर चर्चेत आहे ती, तिच्या अपहरणामुळे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या सिरियलमध्ये अभिनेत्रींना खोटंखोटं किडनॅप करायला लावणारी दिग्दर्शक आज, स्वत:च किडनॅप झाल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली.


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आपल्या ऑफिसमधून बाहेर पडल्यावर एकता कपूरला दोन अज्ञात व्यक्तिंनी घरलं. या व्यक्तींनी आपल्या तोंडला रुमाल बांधला होता, ज्यामुळे त्यांचा चेहरा देखील नीट पाहाता येत नाहीय.


या दोघांनी बंदुकीचा धाक दाखवत एकताला घाबरवलं आणि गाडीत बसायला लावलं, त्यादरम्यान बाजूला उभ्या असलेल्या पॅपराजींनी या घटनेचा व्हिडीओ टीपला, जो सोशल मीडियावर आता सर्वत्र व्हायरल होत आहे. हे दोन व्यक्ती पॅपराझींना देखील भीती दाखवत होते, ज्यामुळे त्यांना देखील यात काही करता आले नाही.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


एकता कपूरचं अपहरण का केलं असावं?


अनेक लोकांचं म्हणणं आहे की, हा फेक व्हिडीओ असावा. तर काही लोकांनी असं देखील सांगितलं आहे की,  कंगना चा न्यू शो 'लॉकअप'चं प्रमोशन असावं किंवा एकता कपूर याचा एक भाग असावी, ज्यामुळे हा व्हिडीओ केला गेला असावा, परंतु असे नाही.


एकताचं हे अपहरण तिच्या वेब सिरिजसाठी करण्यात आलंय, एकता कपूरची 'अपहरण 2' बेब सिरिज येतेय, ज्यामुळे तिने प्रमोशन करण्यासाठी हा व्हिडीओ टाकला आहे. एकताचे खरेखुरे अपहरण झाले असले, तरी तो फक्त मनोरंजनाचा एक भाग आहे.