मुंबई : 'डेली सोप क्वीन' म्हणून ओळखल्या जाणारी एकता कपूर सरोगसीच्या माध्यमातून एका बाळाची आई बनलीय. कपूर कुटुंबीयांसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे... आणि तो तर सेलिब्रेट व्हायलाच हवा... एकतानं नुकताच आपल्या बाळाच्या नामकरण विधीच्या निमित्तानं एका पार्टीचं आयोजन केलं होतं... अनेक बॉलिवूड आणि टीव्ही स्टार्सनं या पार्टीला उपस्थिती लावली... आणि बाळाचे लाडही पुरवले. एकताच्या या पार्टीत तिची जवळची मैत्रीण आणि भाजप नेत्या स्मृती इरानी यादेखील सहभागी झाल्या होत्या.


फोटो साभार - योगेन शाह

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकतानं आपल्या मुलाचं नाव रवी कपूर असं ठेवलंय. एकताचे वडील अर्थात जितेंद्र यांचं खरं नाव रवी कपूर आहे. 


एकताच्या मुलाच्या नामकरण विधीच्या या पार्टीला अभिषेक बच्चनपासून करण जोहरपर्यंत अनेक बॉलिवूड मंडळींनी उपस्थित दर्शवली.


टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉय हीदेखील या पार्टीत सहभागी झाली. शिल्पा शेट्टीची बहिणी आणि अभिनेत्री शमिता शेट्टी मौनीसोबत दिसली.


फोटो साभार - योगेन शाह

आपल्या वडिलांच्या नावावरूनच आपल्या मुलाचं नाव 'रवी' ठेवल्याचं एकतानं काही दिवसांपूर्वी म्हणत बाळाच्या नावाचा खुलासा केला होता. 



तीन वर्षांपूर्वी एकताचा भाऊ आणि अभिनेता तुषार कपूर याच्या मुलाचा जन्मही सरोगसीच्या माध्यमातून झाला होता. तुषारनं आपल्या मुलाचं नाव 'लक्ष्य' असं ठेवलंय. कुटुंबात रवीचं आगमन झाल्यानंतर आता लक्ष्य मोठा भाऊ बनलाय. दोन्ही मुलांना एकता - तुषार 'सिंगल पॅरेटस्' म्हणून सांभाळत आहेत.