मुंबई :  जगभरात ओळखले जाणारे अमेरिकन उद्योगपती एलोन मस्क वयाच्या 50 व्या वर्षी 7 व्या मुलाचे वडील बनले आहेत. त्यांची एखाद्या सेलिब्रिटी प्रमाणे चर्चा होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण त्यांची दुसरी पत्नी ग्रिम्स दुसऱ्यांदा आई बनली आहे, ग्रिम्स एक लोकप्रिय हॉलीवूड गायिका आहे. डिसेंबर 2021 मध्ये, ग्रिम्स सरोगसीद्वारे दुसऱ्यांदा मुलीची आई बनली, परंतु दोघांनीही ही गोष्ट लपवून ठेवली होती, आता त्यांनी ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली आहे. 


डिसेंबरमध्ये जन्मलेल्या मुलीचे नावही या जोडप्याने उघड केले आहे. इलॉन मस्क आणि ग्रिम्स यांनी त्यांच्या मुलीचे नाव एक्सा डार्क सिडरेल ठेवले आहे. हे नाव उच्चारायलाही अवघड आहे आणि ते खूप वेगळे आहे.


उद्योगपतीने मुलीचं नाव असं ठेवलं आहे, की तिला हाक मारणं ही अनेकांना कठीण झालं आहे. त्यामुळे मुलीचं नाव ठेवायला त्यांना सुचलं नसेल अशी चर्चा देखील होत आहे. त्यामुळे त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. 



दुसरीकडे, जर तुम्हाला हे नाव उच्चारण्यात अडचण येत असेल, तर अॅलनने मुलीचे टोपणनाव देखील ठेवले आहे जे Y आहे. तर जोडप्याने मुलीच्या नावाचा अर्थ देखील सांगितला आहे. तिने पोस्टमध्ये याबाबत सांगितलं आहे.