Emergency Trailer Out : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) आगाम इमर्जन्सी सिनेमाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. कंगना रनौतने या सिनेमामध्ये माझी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.  कंगना रनौतचा 'इमर्जन्सी' सिनेमा 6 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. अशातच स्वातंत्र्य दिवसाच्या एक दिवसआधी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. इंदिरा गांधी यांचा पंतप्रधान असतानाचा प्रवास या सिनेमाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. भाजप खासदार कंगना रनौत या सिनेमामध्ये इंदिरा गांधी यांची भूमिका कशाप्रकारे साकारली असणार? असा सवाल विचारला जातोय. राजकीय व्यासपीठावर या सिनेमाची चर्चा होतीये.



चित्रपटाच्या ट्रेलरला पाहताच जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. 'आणीबाणी' हा चित्रपट 1975 साली देशात लागू करण्यात आणीबाणीवर भाष्य करणारा आहे. आणीबाणीमध्ये अनेक मानवी अधिकार काढून घेण्यात आले होते. माध्यमांवर टाकण्यात आलेली बंधी, संजय गांधी यांनी देशभर राबवलेले कार्यक्रम आणि इतर गोष्टींवर देखील या सिनेमामध्ये प्रकाश टाकण्यात आलाय. तर 1971 च्या युद्धावर देखील यामध्ये दृष्यमांडणी करण्यात आलीये. 


काय म्हणाली कंगना रनौत?


माझ्यासाठी आजचा दिवस खूप भावनिक आहे. मी हा चित्रपट बनवण्यासाठी खूप कठीण परिस्थितींचा सामना केला. इंडस्ट्रीने मला पूर्णपणे बायकॉट केलं आहे. कुणीही मला पाठिंबा दिला नाही. मला खूप त्रास सहन करावा लागला. या सिनेमामध्ये ज्यांनी कास्ट केलंय. त्यांनी माझी साथ कधीच सोडली नाही. इमर्जन्सी हा इन्फॉर्मेटिव्ह चित्रपट आहे. त्यामुळे सिनेमा सर्वांचं नक्कीच मनोरजंन करेल, अशी अपेक्षा देखील कंगना व्यक्त केली आहे. 


दरम्यान, या सिनेमामध्ये कंगना रनौतसह श्रेयाल तळपदे, सतीश कौशिक, महिमा चौधरी, अनुपम खेर आणि मिलिंद सोमण सारख्या अभिनेत्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. या चित्रपटात अनुपम खेर जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारत आहेत. तर श्रेयस तळपदेने अटल बिहारी वाजपेय यांची भूमिका पडद्यावर मांडली आहे. तसेच अनुपम खेर हे जय प्रकाश नारायण यांची भूमिका साकारणार आहेत.