मुंबई  : नुकतीच एमी अवॉर्ड्स 2023 च्या पुरस्कारांची घोषणा झाली. यावेळी भारतातून वीर दास याला कॉमेडी विभागातून पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंटरनॅशनल एमी  अवॉर्ड्स २०२३ मध्ये कॉमेडी विभागात खिताब जिंकून वीर दासने इतिहास रचला आहे. हे वीरचं दुसरं इंटरनॅशनल एमी नामांकन आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अभिनेत्याने कॉमेडी स्पेशल वीर दास: लँडिंगसाठी पुरस्कार पटकावला आहे. याचबरोबर निर्माती एकता कपूरला ५१वा इंटरनॅशल एम्मीजमध्ये  इंटरनॅशनल एमी डायरेक्टोरेट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. या अवॉर्डची घोषणा करताना इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्सचे अधिकारी यांनी ट्विटरवर ट्विट करत लिहीलं की,  आमच्याकडे टाई आहे. कॉमेडीसाठी इंटरनॅशनल एमी वीर दास: लँडिगला जातं आहे जो वियडॉर्ट्स कॉमेडी. तर रॉटेन सांयन्स नेटफ्लिक्स द्वारे निर्मीत आहे. तर अन्य नामांकनात अर्जेंटिनाचा एल एनकारडो आणि फ्रांसीसी शो ले फ्लैम्बो सीझन २मध्ये सामिल होता. 


या पुरस्कार सोहळ्यात एकता कपूरला तिच्या अग्रगण्य कामगिरी आणि भारतीय टेलिव्हिजनवर परिदृश्यवर प्रभाव'साठी निदेशालय पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. एकताने आपल्या पुरस्कार पटकवण्याचं वर्णन करत सांगितलं की, मी भारावून गेली आहे मला आश्चर्याचा धक्का बसला आहे. पुरस्कार पटकावल्यानंतर तिने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ''हे माझ्या भारतासाठी आहे. मी तुमच्या एमी पुरस्काराला घरी घेवून जात आहे. ''


दास म्हणाला म्हणाला की, सर्वोत्कृष्ट कॉमेडी सिरीजसाठी आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार जिंकणं हा एक अभूतपूर्व सन्मान आहे जे एक स्वप्न सत्यात उतरलं आहे. "कॉमेडी श्रेणीमध्ये, 'वीर दास: लँडिंग' हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे," असं दास यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. एमी ही केवळ माझ्यासाठीच नाही तर संपूर्ण भारतीय विनोदी जगताची उपलब्धी आहे. 'वीर दास: लँडिंग'जागतिक स्तरावर त्याचा प्रतिध्वनी होताना पाहून आनंद होतोय. हे खास बनवल्याबद्दल नेटफ्लिक्स, आकाश शर्मा आणि रेग टायगरमॅन यांचे आभार.'' ही कामगिरी करणारा दास हा पहिला भारतीय विनोदी अभिनेता देखील आहे.


या सिनेमांनेदेखील मारली बाजी
बेस्ट एक्टर- मार्टिन फ्रीमॅन (रिस्पांडर)
बेस्ट एक्ट्रेस- करला रोउज (ला काइडा डाइव)
टीवी/मिनी सीरिज- ला काइडा (डाइव) (Dive -La caída)
इंटरनॅशनल एमी फॉर किड्स कॅटेगरी
लाइव एक्शन- हार्टब्रेक हाई
फॅक्चुअल आणि एंटरटेनमेंट- बिल्ट टू सर्वाइव
एनिमेशन- स्मड्स एंड द स्मूज
इंटरनॅशनल अवॉर्ड ड्रामा सीरीज- द एम्प्रेस
इंटरनॅशनल अवॉर्ड डॉक्यूमेंट्री- मारीयूपोल