Emraan Hashmi: बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीने महेश भट्ट यांचा फुटपाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2003 मध्ये त्याने पहिला चित्रपट केला. मात्र, तुम्हाला माहितीये का इम्रान ये जिंदगी का सफर या चित्रपटात बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार होता. या चित्रपटाची हिरोईन अमीषा पटेल होती. मात्र, तिनेच इम्रानला या चित्रपटातून बाहेर काढले, असा खुलासा खुद्द इम्रान हाश्मीनेच केला आहे. तसंच, त्याचे कारणदेखील सांगितले आहे. तसंच, चित्रपटातून काढल्यानंतर इम्रानने काय केलं, याचा खुलासादेखील त्याने केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Emraan Hashmi सध्या त्याची सीरीज शोटाइमसाठी चर्चेत आहे. त्याच्या पहिल्या सिझनचा दुसरा पार्ट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. इम्रानने द लल्लनटॉपला दिलेले मुलाखतीत त्याने म्हटलं आहे की, त्याचा पहिला चित्रपट जिंदगी का सफर हा असता. त्यात सुरुवातीला गोविंदा लीड रोलमध्ये होते. मात्र, नंतर इम्रानला या चित्रपटासाठी घेण्यात आले. मात्र, नंतर इम्रानलादेखील चित्रपटातून काढण्यात आलं. 


इम्रान हाश्मीने म्हटलं आहे की, मी तेव्हा रोशन तनेजासोबत अभिनयाचा कोर्स करत होतो. एक महिन्यानंतर महेश भट्ट यांनी फोन केला आणि सांगिली की गोविंदा आता हा चित्रपट करणार नाहीयेत. त्यांच्या डेट्स मॅच होत नाहीयेत. त्यानंतर रोशन तनेजा यांना त्यांनी विचारलं की, इम्रान चित्रपटाच्या शूटिंगसाठी तयार आहे का? तेव्हा तनेजा यांनी सांगितलं की हो तो तयार आहे. मी ते ऐकलं आणि मला खूप भीती वाटायला लागली. कारण मी अजूनही तयार नव्हतो. मी अजूनही मानसिकरित्या तयार नव्हतो. कारण मी स्वतःला एका चित्रपटासाठी तयार करत होतो. जी एक महिन्यानंतर प्रदर्शित होणार होती. 


इम्रान हाश्मीने पुढं म्हटलं आहे की, मी त्यांना म्हटलं होतं की मी अजूनही तयार नाहीये. तेव्हा भट्ट साहेबांनी सांगितले की, असं तर तु कधीच तयार नाही होणार, तुला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. तेव्हाच अमिषाला वाटलं की मी अजूनही खूप कच्चा आहे. तिला असं वाटलं की मी हे करु शकत नाही. कारण तिने यापूर्वीच एक हिट चित्रपट केला होता. त्यामुळं ती चिंतेत होती. 


अमिषा पटेलला वाटत होतं की हिरोसाठी कास्टिंग योग्य असायला हवी. या भूमिकेसाठी एखाद्या अनुभवी अभिनेत्याला कास्ट करावं. कोण्या अशा व्यक्तीला नाही ज्याने फक्त एक महिन्याचा अॅक्टिंगचा कोर्स केला असेल. त्यामुळं ती भट्ट साहेबांकडे गेली. तिने म्हटलं की, मला असं वाटतं की इम्रान या चित्रपटासाठी फिट नाहीये. तिच्या या वक्तव्यामुळं मी चिडलो. मला तिच्यावर खूप राग आला. पण पण जेव्हा या सगळ्याचा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की अमिषा योग्य होती, असं इम्रान म्हणतो. 


चित्रपटातून काढून टाकल्यानंतर मी नेहमी सेटवर जायचो आणि अमिषाला रागात पाहायचो. मी सेटवर जाऊन शूटिंग पाहायचो. मी भट्ट साहेबांनादेखील म्हटलं मला एक संधी द्या. मला अभिनय जमणारच नाही असं काही नव्हतं. फक्त अमिषाला असं वाटलं होतं की मी करु शकणार नाही. मला त्यावेळी काही काम नव्हतं त्यामुळं मी चित्रपटाच्या सेटवर जायचो. मात्र त्यानंतर मला माझा पहिला चित्रपट मिळाला.