मुंबई : बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी याने एक मोठा खुलासा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इमरान हाशमी याने सांगितले की, माझी पत्नी ज्यावेळी पोकर खेळत असते त्यावेळी आपल्या जवळपास मला राहू देत नाही. असं करण्यामागचं कारणं म्हणजे ती मला अशुभ मानते.


इमरान हाशमी याने एका मुलाखतीत म्हटले की, मी कधीही पोकर जिंकलो नाहीये. मात्र, माझी पत्नी यामध्ये खूपच हूशार आहे. ज्यावेळी ती आपल्या मैत्रिणींसोबत पोकर खेळत असते त्यावेळी मला जवळ येऊ देत नाही. कारण ती मला अशुभ मानते.


इमरान हाशमीने बंगळुरुमध्ये आयोजित 'द स्पाटर्न पोकर्स इंडिया पोकर चॅम्पियनशीप अवॉर्ड्स सेरेमनी' दरम्यान हा खुलासा केला आहे. इमरान हाशमीने म्हटलं की, पोकर खेळण्यासंदर्भात लोकांची जी मानसिकता आहे ती आता बदलत आहे. आता पोकरला एक खेळ समजलं पाहिजे.


इमरान हाशमी याचा 'बादशाहो' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या सिनेमात अभिनेता अजय देवगण, इलियाना डिक्रूज आणि ईशा गुप्ता यांचीही प्रमुख भूमिका होती. १ सप्टेंबर रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने ६ दिवसांत ६० कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवला.