`या` भारतीय सिनेमात झळकणार हा WWE सुपरस्टार
तुम्ही WWE म्हणजेच वर्ल्ड रेसलिंग इंटरटेन्मेंट पाहता? तर मग तुमच्यासाठी एक खास बातमी आहे.
नवी दिल्ली : तुम्ही WWE म्हणजेच वर्ल्ड रेसलिंग इंटरटेन्मेंट पाहता? तर मग तुमच्यासाठी एक खास बातमी आहे. कारण, WWE मधील सुपरस्टार स्कॉट स्टाइनर हा लवकरच भारतीय सिनेमात झळकणार आहे.
प्रभाकर शरण भारतीय प्रेक्षकांसाठी एक हिंदी आणि भोजपुरीमध्ये आपला सिनेमा '१ चोर २ मस्तीखोर' (एनरेडाडोस: ला क्न्फ्यूजन) रिलीज करण्यासाठी तयार आहे. हा एक भारतीय लॅटीन-अमेरिकन सिनेमा आहे. बुधवारी या सिनेमाचा भोजपुरी ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. (व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
हा सिनेमाचं आशीष आर मोहनने दिग्दर्शन केलं आहे आणि प्रभाकर शरण मुख्य भूमिकेत आहे. सिनेमातील महत्वाची बाब म्हणजे यामध्ये WWE सुपरस्टार स्कॉट स्टाइनर यानेही भूमिका केली आहे. तसेच स्कॉट या सिनेमात भोजपुरी बोलताना दिसणार आहे.
या सिनेमात स्कॉट स्टाइनर हा भोजपुरी अंदाजात डायलॉग बोलताना आणि अॅक्शन करताना दिसणार आहे. त्याला रेसलिंगच्या जगात 'बिग पापा पंप' या नावाने ओळखलं जातं. या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंग दरम्यान प्रभाकर यांनी सांगितले की, आपल्या आगामी '१ चोर २ मस्तीखोर' या सिनेमासाठी १४ किलो वजन वाढवलं आहे.
प्रभाकर यांनी सांगितले की, हा सिनेमा त्यांचं एक ड्रिम प्रोजेक्ट आहे आणि १७ वर्षांच्या मेहनतीचा परिणाम आहे. सिनेमातील आपली भूमिका चांगली बनविण्यासाठी वजनही वाढवलं.
'एनरेडाडोसः ला कन्फ्यूजन' च्या यशानंतर '१ चोर २ मस्तीखोर' नावाने हिंदी आणि भोजपुरीमध्ये हा सिनेमा डब करण्यात आला. हा सिनेमा ९ नोव्हेंबर रोजी बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसोबतच देशभरात प्रदर्शित होणार आहे.