Ranbir Kapoor : बॉक्सऑफिसवर अभिनेता रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमल (Animal) चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली. या चित्रपटाने देशात 546 कोटी तर जगभरात 890 कोटी रुपयांची कमाई केल्याचं सांगितलंय जातंय. अ‍ॅनिमलच्या तुफान यशानंतर आता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आपल्या नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. आगामी रामायण चित्रपटामुळे रणबीर कपूर सध्या चांगलाच चर्चेत आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण (Ramayan) या चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्री रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटाचा गाजावाजा सुरु झाला असून या दरम्यान रणबीर कपूर यांनी आपल्या चाहत्यांसाठी आणखी एक खुशखबर दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीर कपूरने दिली गुडन्यूज
अभिनेता रणबीर कपूरच्या घरी नवा पाहुणा दाखल झाला आहे. सोशल मीडियावर याचे व्हिडिओजही शेअर करण्यात आले आहेत. वास्तविक रणबीर कपूरने महागडी कार खरेदी केली आहे. बेंटले कॉन्टिनेंटल जीटी वी8 असं या लक्झरी कारचं नाव आहे. रणबीर कपूरने स्वत: चालवत कार घरी आणली. इंस्टंट बॉलिवूडने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रणबीर कपूर नव्या कारने फिरताना दिसतोय. 


किती आहे किंमत
कार देखो डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार रणबीर कपूरच्या नव्या लक्झरी बेंटले कॉन्टिनेंटल जीटी वी8 (Bentley Continental GT V8) या कारची किमत जवळपास साडेपाच कोटी रुपये इतकी आहे. तर काही रिपोर्टसनुसार या कारची किंमत 6 कोटींहून अधिक आहे. रणबीर कपूरच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका अलिशान कारचा समावेश झाला आहे. 



रणबीर कपूरचं कार कलेक्शन
रणबीर कपूरच्या कार कलेक्शनमध्ये अनेक लक्झरी कारचा समावेश आहे. यात ऑडी ए8एल, ऑडी आर8, लँड रोवर रेंज रोवर स्पोर्ट, मर्सिडीज बेंस एएमजी जी-63, लँड रोवर रेंज रोवर वोग, लँड रोवर रेंज रोवर एसयूवी सारख्या महागड्या कार आहेत. याशिवाय रणबीर कपूरकडे हार्वेल डेव्हिडसन ही महागडी बाईकदेखील आहे. 


रामायण चित्रपटामुळे चर्चेत
रणबीर कपूर सध्या अ‍ॅनिमल चित्रपटाचं यश एन्जॉय करतोय. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटाने देशातच नाही तर जगभरात धुमाकूळ घातला. त्यानंतर आता रणबीर कपूर रामायण चित्रपटात चित्रीकरणात व्यस्त झालाय. रणबीर कपूर या चित्रपटात रामाची भूमिका साकारत असून दक्षिणेची अभिनेत्री साई पल्लवी माता सीताची भूमिका साकारणार आहे. 3 एप्रिलपासून या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झालीय.