Sonu Sud Deep Fake Video : तंत्रज्ञानाच्या मदतीने सेलिब्रेटिंचे व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या गेल्या काही दिवसात अनेक घटना घडल्या आहेत. आता यात बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) भर पडली आहे. सोनू सूदने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपला डीप फेक व्हिडिओ शेअर केला आहे. एका कुटुंबाला मदतीचं आश्वासन देतानाचा हा खोटा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अभिनेत्री रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandana) आक्षेपार्ह व्हिडिओ बनवण्यात आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल झाला. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. पण काही दिवसातच अभिनेत्री काजोलचाही (Kajol) डीप फेक व्हिडिओ बनवण्यता आला. त्यानतंर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) व्हिडिओ बनवण्यात आला. या व्हिडिओच्या माध्यमातून सचिन एक ऑनलाईन गेम खेळत पैसे कमवण्याचा सल्ला देताना दिसत होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानतंर सचिनने याची सायबर पोलिसात तक्रार दाखल केली. 


सोनू सूदने शेअर केला व्हिडिओ
हे प्रकरण ताजं असतानाच आता अभिनेता सोनू सूदचा डीप फेक व्हिडिओ (Deep Fake Video) व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सोनू सूदने एक्स अकाऊ्ंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत सोनू सूद एका कुटुंबाला मदतीचं आश्वासन देत असल्याचं दाखवण्यता आलं आहे. हा व्हिडिओ शेअर करत सोनू सूदने लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. 


सोनू सूदने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय 'माझा व्हिडिओ डिप फेक आहे. माझ्यासाठी ही धक्कादायक घटना आहे. कोणीतरी स्वत:ला सोनू सूद असल्याचं सांगत  व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एका कुटुंबाला मदतीचं आश्वासन दिलंय. अनेक निष्पाप लोकं अशा जाळ्यात फसतायत. असे खोटे पोन आल्यास सावधान राहा असं आवाहनही सोनू सूदने केलं आहे. 


काय म्हटलंय व्हिडिओत
व्हायरल व्हिडिओत सोनू सूद एका कुटुंबाला मदतीचं आश्वासन देताना दिसतोय. यात तो म्हणतोय 'व्यस्त असल्याने मी तुमची मदत करु शकलो नाही. त्या कुटुंबाने कर्ज घेऊन उपचार केले ते कर्ज मी फेडू इच्छितो. मला फोन करायला सांगा' असं या व्हिडिओत संभाषण आहे. 



सचिन तेंडुलकर डीप फेक व्हिडिओत कारवाई
फलंदाज सचिन तेंडुलकरही डीप फेकच्या जाळ्यात अडकला. याप्रकरणी सचिनने चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली आहे. एका वेबसाईट आणि एका फेसबूक पेजविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.