Entertainment News : हिंदी सिनेमासृष्टीत (Bollywood) काम करत असताना अनेक अभिनेते-अभिनेत्रींच्या जोड्या जमल्या आहेत. अभिषेक बच्चन-ऐश्वर्या रॉय, दीपिका पदूकोण-रणवीर सिंग, कतरीना कैफ-विक्की कौशल्य, आलिया भट-रणवीर कपूर, कियारा अडवाणी- सिद्धार्थ मल्होत्रा. या सर्व जोड्या बॉलिवूडमध्ये यशस्वी ठरले आहेत. लग्नानंतरही या जोड्या चित्रपटात भूमिका साकारताना दिसत आहेत. पण यातही सर्वात लोकप्रिय जोडी म्हणजे विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Aishwarya Roy-Abhishek Bachchan).


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी जमली जोडी
अभिषेक आणि ऐश्वर्या, दोघांनी काही सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. चित्रीकरण सुरु असताना दोघांचे सूर जुळले. 2007 च्या जानेवारी महिन्यात या जोडीने गुपचूप साखरपुडा केला आणि 20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा शाही विवाह सोहळा (Abhishek-Aishwarya Wedding) मुंबईतल्या 'प्रतिक्षा' बंगल्यात संपन्न झाला. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन या दोघांनी 'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटात पहिल्यांदा काम केलं. यानंतर 'बंटी और बबली' या चित्रपटातील 'कजरा रे' या गाण्याचे शूटींग सुरु असताना दोघांचं सूत जुळलं. आणि 'गुरु' चित्रपटाच्या सेटवर दोघांचं प्रेम चांगलंच बहरलं. 


अभिषेकचा जुना फोटो व्हायरल
या दोघांची चर्चा होण्याचं कारण म्हणजे अभिषेक बच्चन याचा एक जुना फोटो (Abhishek Bachchan Old Photo) व्हायरल होतोय. हा फोटो 1994 मधला असल्याचं सांगितलं जात आहे. याच वर्षात ऐश्वर्या रॉय मिस वर्ल्ड (Miss World) बनली होती. त्यावेळी अभिषेक बच्चन कसा दिसत होता याची उत्सुकता चाहत्यांना आहे. या फोटोत अभिषेक आपले वडिल आणि बॉलीवूडचे बीग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसत आहे. या फोटोमध्ये अभिषेक बच्चन अगदी साध्या पेहरावात दिसत आहे.



ऐश्वर्या रॉय 'मिस वर्ल्ड'
त्याचवेळी ऐश्वर्या रॉयचा मिस वर्ल्ड दरम्याचा फोटोही व्हायरल होतोय. या फोटोत ऐश्वर्या रॉयच्या डोक्यावर मिस वर्ल्डचा ताज आहे. आणि मिस वर्ल्डच्या कपड्यांमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. यानंतर ऐश्वर्या रॉयने हिंदी सिनेमासृष्टीत पदार्पण केलं आणि एक यशस्वी अभिनेत्री म्हणून काम कमावलं. मिस वर्ल्डचा खिताब जिंकल्यानंतर 1997 मध्ये ऐश्वर्याने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ऐश्वर्याने मणिरत्नम यांच्या इरुवर या चित्रपटातून पदार्पम केलं. या चित्रपटात ऐश्वर्या रॉयबरोबरच प्रकाश राज, तब्ब, रेवती आणि कल्पना अय्यर हे कलाकार होते. 


त्यानंतर गेली पंचवीस वर्ष ऐश्वर्या रॉयने अनेक हिंदी चित्रपटात भूमिका साकारली. 1999 साली प्रदर्शित झालेल्या हम आपके है कौन, चित्रपटासाठी ऐश्वर्याला सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्का मिळाला.