Amitabh Bachchan 81th Birthday : शतकातील महानायक अमिताभ बच्चन अर्थात बिग बी 11 ऑक्टोबरला आपला 81 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याबरोबरच त्यांच्या चाहत्यांसाठी हा वाढदिवस (Birthday) खूप खास असणार आहे. वास्तविक, बिग बींच्या वाढदिवसाआधी त्यांच्या चित्रपटांशी संबंधित गोष्टींचा लिलाव केला जाणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे 'शहेनशाह' अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभियनाने हिंदी चित्रपटसृष्टीवर (Bollywood) छाप उमटवली आहे. अमिताभ बच्चन यांनी पाच दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने गाजवला आहे. केवळ अभिनयासाठीच नाही तर प्रतिभावान व्यक्तीमत्व म्हणूनही ते सिनेसृष्टीची शान ठरले आहेत. 11 ऑक्टोबर 2023 रोजी महान सुपरस्टार अमिताभ बच्चन 81 वर्षांचे होतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांचा हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. अमिताभ बच्चन यांनी अभिनय केलेल्या काही सुपरहिट चित्रपटात त्यांनी वापरलेल्या काही वस्तूंचा लिलाव केला जाणार आहे.  हा लिलाव डी'रिवाझ अँड आईव्सद्वारे आयोजित केला जाणारअसून 5 ते 7 ऑक्टोबरदरम्यान चाहत्यांसाठी हा लिलाव खुला असणार आहे. 


या कार्यक्रमाचं 'बच्चनेलिया' असं नाव देण्यात आलं असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांना सलामी देण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या लिलाव केल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये त्यांच्या सुपरहिट चित्रपटाचे पोस्टर्स, छायाचित्रे, लॉबी कार्ड, शोकार्ड छायाचित्रे, पुस्तके आणि मूळ कलाकृतींचा समावेश आहे.


लिलावातील प्रमुख आकर्षण
या लिलावाचं प्रमुख आकर्षण असणार आहे ते जंजीर, दिवार, शोले यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांतील वस्तू. या लिलावाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांच्या सुवर्णकाळातील आठवणी ताज्या होणार आहेत. 


याशिवाय लिलावात अमिताभ बच्चन यांचे हिट चित्रपट मजबूर (1974), मिस्टर नटवरलाल (1979), द ग्रेट गॅम्बलर (1979), सिलसिला (1981) कालिया (1981), नसीब (1986) यांचा समावेश आहे. तसंच प्रसिद्ध फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांनी चित्रित केलेल्या अमिताभ बच्चन यांच्या एका स्टुडिओ चित्राचा लिलावात समावेश आहे. डी'रिवाज एंड आईव्स यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि अनोख्या पद्धतीने साजरा करण्याची खास तयारी करण्यात येत आहे. 


अँग्री यंग मॅन
अमिताभ बच्चन यांना त्यांच्या चित्रपटांमधून 'अँग्री यंग मॅन' ही पदवी मिळाली आहे. शतकातले महानाय म्हणून ते ओळखले जातात. अमिताभ बच्चन यांना तीन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. तर 14 वेळा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. भारत सरकारनेही त्यांचा पद्मश्री आणि पद्मभूषण देऊन सन्मान केलाय.