Entertainment News : बॉलिवूडध्ये असे अनेक सेलिब्रेटी (Bollywood Celebrities) आहेत ज्यांनी घटस्फोट घेतलाय किंवा त्यांचा ब्रेकअप झाला आहे आणि पुन्हा लग्न केलं आहे. काही सेलिब्रेटी अनेक वर्षे एकमेकांना डेट करतात. यातील काहींचं नातं लग्नापर्यंत पोहचतं तर काहींचा ब्रेकअप होतो. काहींनी लग्न करुन घटस्फोट घेतला आणि पुन्हा दुसरं लग्न केलं. बॉलिवुडमधल्या अशाच काही जोड्यांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आपल्या पतीच्या पहिल्या लग्नावेळी या अभिनेत्रींचं वय किती होतं हे जाणून तुम्ही हैराण व्हाल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. करीना कपूर आणि सैफ अली खान
बॉलिवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री करीन कपूरने (Kareena Kapoor) सैफ अली खानबरोबर (Saif Ali Khan) लग्न केलं. पण त्याआधी सैफ अली खानचं अभिनेत्री सैफ अलीबरोबर पहिलं लग्न झालं होतं. लग्नाच्या 13 वर्षांनंतर सैफ आणि अमृता यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. करीना कपूरचा जन्म 21 सप्टेंबर 1980 ला झाला. म्हणजे सैफ आणि अमृताचं जेव्हा लग्न झालं तेव्हा करीना कपूर फक्त 11 वर्षांची होती. सैफच्या पहिल्या लग्नात करीना सहभागीही झाली होती. 


2. किरण राव आणि आमिर खान
अभिनेता आमिर खानचं (Amir Kahn) पहिलं लग्न रीना दत्ताबरोबर (Reena Dutta) 1986 साली झालं. 2002 मध्ये रीना दत्ता आणि आमिर खान यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर तब्बल  3 वर्षांनंतर आमिर खानने किरण रावशी (Kiran Rao) लग्न केलं. किरण राव आणि आमिरचं सूत लगान सिनेमाच्या चित्रीकरणावेळी जुळलं. किरण राव ही त्यावेळी आशुतोष गोवारीकरला दिग्दर्शनात सहकार्य करत होती. मजेशी गोष्ट म्हणजे आमिर खानचं पहिलं लग्न झालं त्यावेळी किरण राव 13 वर्षांची होती. 2005 मध्ये आमिर खान आणि किरण रावने लग्न केलं, पण नुकताच त्यांनी घटस्फोट घेतला.


3. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्याशी लग्न केलं. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचं नाव प्रकाश कौर असं असून त्यांचं लग्न 1954 मध्ये झालं. तर हेमा मालिनी यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1946 मधला. म्हणजे धर्मेंद्र यांच्या पहिल्या लग्नात हेमा मालिनी फक्त 7 वर्षांच्या होत्या.


4. मान्यता दत्त आणि संजय दत्त
बॉलिवूडमधला सर्वात चर्चेतला अभिनेता म्हणजे संजय दत्त (Sanjay Dutt). 1987 मध्ये संजय दत्तने रीचा शर्माबरोबर (Richa Sharma) लग्न केलं. रिचा शर्माबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर संजय दत्तने रिया पिल्लेबरोबर दुसरं लग्न केलं. काही वर्षांतच म्हणजे 1998 मध्ये हे दोघं विभक्त झालं. यानंतर संजय दत्तने 2008 मध्ये तिसरं लग्न केलं. मान्यता (Manyata Dutt) आणि संजय दत्त विवाहबंधनात अडकले. पण संजय दत्तच पहिलं लग्न झालं तेव्हा मान्यताचं वय होतं अवघ 7 वर्ष. 


5. शबाना आझमी आणि जावेद अख्तर
प्रसिद्ध गीतकार आणि राज्यसभेचे माजी खासदार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांचं पहिलं लग्न हनी इराणी यांच्याबरोबर 1972 मध्ये झालं. यानंतर त्यांनी शबाना आझमीबरोबर लग्न केलं. शबाना आझमी (Shabana Azmi) यांचा जन्म 1950 मध्ये झाला. म्हणजे पती जावेद अख्तर यांच्या पहिल्या लग्नावेळी शबाना आझमी यांचं वय 22 वर्ष होतं.


6. अमला अक्किनेनी आणि नागार्जून
दक्षिणेतला प्रसिद्ध अभिनेता नागार्जुनचं (Nagarjuna) पहिलं लग्न 1984 मध्ये लक्ष्मी दुग्गबाती हिच्याबरोबर झालं. त्यानंतर नागार्जुनाने अभिनेत्री अमलाबरोबर (Amala Akkineni) लग्न केलं. अमलाचा जन्म 1970 साली झाला. म्हणजेच नागार्जुनचं पहिलं लग्न झालं त्यावेळी अमलाचं वय 14 वर्ष होतं.