Entertainment News : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सध्या आपला आगामी चित्रपट चकदा एक्स्प्रेसच्या (Chakda Xpress) शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाची शुटिंग कोलकातामध्ये (Kolkata) सुरु आहे. या चित्रपटाच्या शुटिंगच्या सेटवरचे काही फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून नेटकरी अनुष्काला चांगलेच ट्रोल करतायत. या फोटोमध्ये अनुष्का सफेद शर्ट, स्कर्ट, पायात स्लीपर अशा पेहरावत दिसत आहे. तसंच तीने बॉयकट केला आहे. एका फोटोत अनुष्काच्या हातात बॅट दिसत आहे. या फोटोंवर नेटकऱ्यांनी तिची टिंगल उडवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चकदा एक्स्प्रेस हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि गोलंदाज झुलन गोस्वामी ( Jhulan Goswami) हिच्या जीवनावर आधारीत आहे. अनुष्का शर्मा या चित्रपटात झुलन गोस्वामीचं पात्र साकारतेय. पण अनुष्का शर्माच्या लूकवरुन तिला ट्रोल केलं जातंय. एका युझरने म्हटलंय अनुष्का कोणत्याच अँगलने झुलन वाटत नाहीए. तिचा लूकही लोकांना पसंत पडलेला नाही. केवळ हातात बॅट आणि बॉल घेऊन झुलन सारखं दिसता येत नाही अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे. 



याआधीही अनुष्काने या चित्रपटातील आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यावर लोकांनी टीका केली होती. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्येही अनुष्का ओळखू येत नाहीए. दरम्यान, शुटिंगसाठी कोलकात्यात असणाऱ्या अनुष्काबरोबर तिची लेक वामिकाही (Wamika) तिच्याबरोबर आहे. चकदा एक्स्प्रेस हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित केला जाणार आहे.



4 वर्षांनंतर अनुष्काचा चित्रपट 
तब्बल चार वर्षांआधी अनुष्का शर्मा चित्रपटात दिसली होती. शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि कतरिना कैफबरोबर (Katrina Kaif) अनुष्का मुख्य भूमिकेत होती. पण हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला होता. त्यानंतर अनुष्का आपल्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त झाली. या दरम्यान तिने मुलीला जन्म दिला. आता पुन्हा एकदा अनुष्का सिल्व्हर स्क्रिनवर (Siver Screen) पुनरागमन करणार आहे. 


अनुष्का शर्माने शाहरुख खानबरोबर 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यशराज यांचा हा चित्रपटा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरली होती. त्यानंतर अनुष्काने अनेक चित्रपट केले.