Arijit Singh Apologize : अनेकदा स्टेजवर परफॉर्म करताना अशा घटना घडतात ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खळबळ उडवून देतो. लोकप्रिय गायक अरिजीत सिंगच्या (Arijit Singh) कॉन्सर्टचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अरिजीत सिंग भर स्टेजवरुन चाहत्यांची माफी मागताना दिसत आहे. अरिजीत सिंगसाठी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी (BodyGuards) एक महिला फॅनचा गळा धरुन तिला मागे ढकललं. हे पाहाताच अरिजीत सिंगने त्या महिलेची माफी मागितली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरक्षारक्षकाने महिला फॅनचा गळा धरला


भारताप्रमाणेच जगभरात अरिजीत सिंगच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत. अमेरिकेत अरिजीत सिंगच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अरिजीत सिंगच्या गाण्याने चाहते मंत्रमुग्ध झाले होते. अरिजीत स्टेजवरुन परफॉर्म करत असताना स्टेजखाली असलेली एक महिला फॅन त्याच्याशी हात मिळवण्यासाठी पुढे आली. पण त्याचेवळी तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तिचा गळा धरत तिला मागे ढकललं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.


सुरक्षारक्षकाने चाहत्यांबरोबर केलेली ही गैरवर्तणूक अरिजीतला पटली नाही. त्याने लाखो चाहत्यांसमोर स्टेजवरुन त्या महिलेची माफी मागितली.


अरिजीतने मागितली माफी


अरिजीतचा माफी मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यात तो माइकवर म्हणताना दिसतोय 'कोणालाही अशा प्रकारे पकडणं चांगली गोष्ट नाही, मित्रांनो तुम्ही सर्व जण बसा. यानंतर तो महिलेच्या दिशेने पाहून 'काश तुला वाचवण्यासाठी मी तिथे असतो, पण नाहीए' असं म्हणताना दिसत आहे. अरिजीतचा हा विनम्रपणा लोकांना चांगलाच आवडला आहे. या व्हिडिओवर लोकांनी लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे.



याआधीही अरिजीतचा व्हिडिओ व्हायरल


याआधीही अरिजीत सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत एक चाहता स्टेजच्या एका कोपऱ्यात खाद्यपदार्थ आणि कोल्डड्रींक ठेवतो. अरिजीत या दोन्ही गोष्टी उचलतो आणि हे स्टेज माझ्यासाठी मंदिर आहे, प्लीज असं करुन नका' असं म्हणताना दिसतोय. बॉलीवूडमध्ये अरिजीत सिंगची अनेक रोमांटिक गाणी आहेत. 'मै तो लुट पूट गया', 'हमारी अधुरी कहाणी', 'ओ माही', 'देश मेरा', 'सजनी' या गाण्याने चाहत्यांना वेड लावलंय.