YouTuber Armaan Malik : यूट्यूबर अरमान मलिक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असतो. सोशल मीडियावर त्याचे लाखो फॉलोअर्स आहे. दोन पत्नींसह अरमान रिल्स बनवतो, सोशल मीडियावर याला चांगलीच पसंती मिळते. अरमान मलिक एकाच छताखाली दोन पत्नी आणि चार मुलांसोबत राहातो. दोन्ही पत्नींमध्ये सख्ख्या बहिणींसारखं प्रेम आहे. पण एका मुलाखतीत दोन्ही पत्नींनी अरमान मलिकबाबत (Arman Malik) एक मोठं गुपीत उघड केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही पत्नींना एकच प्रश्न
अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीचं नाव कृतिका तर दुसऱ्या पत्नीचं नाव पायल आहे. कृतिका (Krutika) आणि पायलसह (Payal) अरमान मलिक एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी सिद्धार्थने कृतिका आणि पायलला एक प्रश्न विचारला. या प्रश्नावर कृतिक आणि पायलने दिलेल्या उत्तराने अरमानची पोलखोल झाली.  अरमानबद्दल अशी एक गोष्ट किंवा घटना आहे की ज्यामुळे तुम्हाला वाटतं या व्यक्तीत दम आहे. 


अरमानची झाली पोलखोल
सिद्धार्थने विचारलेल्या प्रश्नावर कृतिकाने पहिल्यांदा उत्तर दिलं. कृतिका म्हणाली, मला एक गोष्ट चांगली आठवतेय, ज्यावेळी अरमानने माझ्याशी लग्न केलं, त्यावेळी मी विचारलं की तू मला कधी सोडणार नाहीस ना, मला काहीच नको, फक्त तू माझ्याशी एकनिष्ठ राहा. यावर अरमानने कितीही वाईट परिस्थिती असो मी तुला कधीच सोडणार नाही, असं आश्वासन दिलं. 


विशेष म्हणजे याच प्रश्नावर पायलनेही तेच उत्तर दिलं. पायल म्हणाली हीच गोष्ट अरमानने मलाही सांगितलं. काही झालं तरी मी तुला सोडणार नाही असं त्याने मला आश्वासन दिलं, असं पायल म्हणाली. पायलच्या उत्तराने कृतिका, पायल आणि सिद्धार्थ आश्चर्यचकित झाले. 


दोन पत्नींसह सुरु केलं यूट्यब चॅनेल
या कार्यक्रमात अरमान मलिकनेही आपल्या लग्नाचा एक किस्सा सांगितला. ज्यावेळी कृतिकाशी लग्नाची चर्चा सुरु होती, त्यावेळी तिच्या कुटुंबियांनी याला आक्षेप घेतला. मुलगा नोकरी करत नाही, तो फक्त यूट्यूबवर व्हिडिओ टाकतो. याने मुलीचं पोट भरणार कसं, कुटुंब कसं चालवणार असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले. पण आज परिस्थिती वेगळी आहे. याच यूट्यूबच्या माध्यमातून  माझ्याबरोबर कृतिका आणि पायलचं चांगलं चाललं आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबाचं युट्यूब चॅनेल आहे आणि आम्ही घरबल्या कमाई करतोय.


यूट्यूबच्या जोरावर आज आपल्याकडे 9 फ्लॅट, कार, दोन ड्रायव्हर आणि चार एडिटर आहेत. याशिवाय व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी चार कॅमेरामनही आहेत अशी माहितीही त्याने दिली. अरमान मलिक जवळपास दोनशे कोटींचा मालक आहे.