Entertainment : बॉलिवूडचा एव्हरग्रीन अभिनेता शाहिद कपूरने (Shahid Kapoor) हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी 20 पूर्ण केली आहेत. चमकदार डोळ्यांच्या या अभिनेत्याने 2003 मध्ये इश्क-विश्क या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याआधी शाहिदने बॅकग्राऊंड आर्टिस्ट आणि स्टेज कार्यक्रमातून भरपूर कामं केली. दिग्गज अभिनेते पंकज कूपर (Pankaj Kapoor) आणि निलिमा अझीम (Neelima Azeem) यांच्याकडून शाहिदला अभिनयाचा वारसा मिळाला. 'जब वी मेट' (2007)  आणि 'कमीने' (2009) या चित्रपटाने शाहिद कपूरला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. यानंतर शाहिद कपूरने बॉक्स ऑफिसवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले.  2014 साली प्रदर्शित झालेल्या 'हैदर' आणि 2016 साली प्रदर्शित झालेल्या 'उडता पंजाब' या चित्रपटातील शाहिद कपूरच्या अभिनयाने टीकाकारांची तोंडही बंद केली. 2019 सालच्या 'कबीर सिंह' या चित्रपटाने तर शाहिदला प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहिदचं ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण
या वर्षाच्या म्हणजे 2023 च्या सुरुवातीला राज अँड डीके यांच्या फर्जी या सीरिजच्या माध्यमातून शाहिद कपूरने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं. याशिवाय अली अब्बस जफर दिग्दर्शित ब्लडी डॅडी हा चित्रपटही जून महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित झाला. 


शाहिद-मीराचा लव्हस्टोरी
शाहिद कपूर आणि मीरा राजपूतही जोडी बॉलिवूडमधलं परफेक्ट कपल मानलं जातं. या दोघांची लव्ह स्टोरी खूपच मजेशीर आहे. मीरा राजपूतचा (Mira Rajput) दूरपर्यंत बॉलिवूडशी संबंध नव्हता. मीरा राजपूत दिल्लीतल्या एका उद्योगपती घरातील मुलगी आहे. शाहिद आणि मीराचं कुटुंब एका अध्यात्मिक कार्यक्रमात एकमेकांना भेटलं. शाहिद आपले वडिल पंकज कपूर यांच्याबरोबर दिल्लीतल्या एका अध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात मीरा आणि तिचं कुटुंबही आलं होतं. इथेच त्यांची पहिली ओळख झाली. पण मीराने जेव्हा पहिल्यांदा शाहिद कपूरला पाहिलं होतं, तेव्हा त्याला पाहून ती खूप घाबरली होती. 


शाहिदच्या कुटुंबियांनी मीराला लग्नाबद्दल विचारल्यावर तीने स्पष्ट शब्दात नकार दिला होता. यामागे कारण होतं ते शाहिद कपूरचा लूक. वास्तविक शाहिद कपूर त्या दिवसात उडता पंजाब या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होता. त्या चित्रपटात त्याचा अवतार खूपच घाबरवणारा आहे. शाहिदला त्या रुपात पाहून मीरा प्रचंड घाबरली आणि तीने लग्नाला नकार दिला. पण त्यानंतर दोघांची ओळख वाढली आणि ओळखीचं रुपांत प्रेमात आणि नंतर  लग्नात झालं. शाहिद-मीराला दोन मुलं आहेत. मीशा आणि जेन अशी या दोन मुलांची नावं आहेत. 


मीराचा फोटो व्हायरल
शाहिद कपूर बॉलिवूडमध्ये चॉकलेट हिरो म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या क्यूट लुकमुळे तरुण वर्गात विशेषत: मुलींचा तो फेव्हरेट आहे. शाहिद कपूर मीरा राजपूतपेक्षा तब्बल वर्षांनी मोठा आहे. म्हणजे ज्यावेळी शाहिद कपूरने इश्क विश्क चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी मीरा राजपूत केवळ 12 ते 13 वर्षांची होती. मीराचा त्यावेळचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत मीरा खूपच क्यूट दिसत असून तिच्या या फोटोवर युजर्सने कमेंटही दिल्या आहेत. वयाच्या एकविसव्या वर्षी मीराचं शाहिदबरोबर लग्न झालं. 



मीरा सोशल मीडियावर सक्रिय
मीरा राजपूतचा बॉलिवूडशी फारसा संबंधन नसला तरी पती शाहिद कपूरबरोबर ती बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यांना हजेरी लावत असते. शिवाय ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असून इन्स्टाग्रामवर तीचे अनेक फॉलोअर्स आहे. आपल्या इन्स्टा अकाऊंटवर ती पती शाहिद आणि मुलांचे फोटो शेअर करत असते. 


शाहिदचा पहिला चित्रपट
'इश्क विश्क' (Ishq Vishk) या चित्रपटातून शाहिदने 2003 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं. या चित्रपटात अमृता राव (Amruta Rao) शाहिदची अभिनेत्री होती. ही जोडी लोकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. इश्क विश्क हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही (Box Office) चांगलाच हिट ठरला होता. या चित्रपटाच्या यशानंतर शाहिद कपूर रातोरात स्टार बनला. त्यानंतर शाहिदने अनेक सुपरहिट चित्रपट (Superhit Movie) दिले.


शाहिद जितका यशस्वी अभिनेता आहेत तितकाच उत्तम पती असल्याचं मीरा राजपूत सांगते. मीराबरोबचे अनेक फोटो शाहिद सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकताच मीरा आणि शाहिदचा एक व्हिडीओ समोर आला होता ज्यामध्ये दोघेही घरी डान्स करताना दिसत होते. हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला होता.