Dear Shahrukh, साऊथ म्हणजे फक्त इडली-वडा नाही! चाहते संतापले... वाचा नेमकं काय झालं?
Shahrukh Khan : बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानचे लाखो चाहते आहेत. पण सध्या काही फॅन्स त्याच्यावर नाराज झाले आहेत. शाहरुखने एका दक्षिणेच्या सुपरस्टारचा इडली-वडा म्हणून उल्लेख केला. यावरुन सोशल मीडिआवर त्याच्याविरुद्ध नाराजी व्यक्त केली जात आहे.
Shahrukh Khan : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान हिंदी चित्रपटसृष्टीतील सध्याचा आघाडीचा सुपरस्टार आहे. बादशाह, पठाण, जवान अशा अनेक नावाने तो चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये (Bollywood) एकापेक्षाएक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या शाहरुखचे (Shah Rukh Khan) देशातच नाही तर विदेशातही लाखो चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झालेले असतात. पण सध्या त्याच्या एका वक्तव्याने चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यात शाहरुखने साऊथच्या एका सुपरस्टार अभिनेत्याची खिल्ली उडवली. यावरुन सोशल मीडियावर चाहते त्याच्यावर संतापले आहेत.
साऊथच्या सुपरस्टारची उडवली खिल्ली
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यात शाहरुखने साऊथचा सुपरस्टार राम चरणचा (Ram Charan) 'इडली वडा' असा उल्लेख केला. शाहरुखच्या या वक्तव्याने रामचरणचे फॅन्स चांगलेच नाराज झाले आहेत. राम चरणची मेकअप आर्टिस्ट जेबा हसनने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली. जेबा हसनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. 'मी शाहरुखची खूप मोठी फॅन आहे, पण ज्या पद्धतीने त्याने राम चरणला स्टेजवर बोलावलं, ते नक्कीच योग्य नव्हतं' इडली वडा सांबार राम चरण कुठे आहेस तू? असा शाहरुखने त्याला आवाज दिला. राम चरणसाठी हे अपमानजनक असल्याचं जेबा हससने म्हटलं आहे.
साऊथच्या चित्रपटांचा जगभरात डंका
राम चरण हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील (South Film Industry) मोठं नाव आहे. गेल्या वर्षी राम चरणचं नाटू-नाटू हे गाणं देशातच नाही तर जगभरात गाजलं. या गाण्याने ऑस्कर आणि गोल्ड अवॉर्ड सोहळ्यातही आपली छाप उमटवली. अशा सुपरस्टारची भर पार्टीत इडली-वडा म्हणत खिल्ली उडवणं शाहरुख सारख्या व्यक्तीला शोभत नाही, असं चाहत्यांचं म्हणणं आहे.
साऊथ म्हणजे केवळ इडली-वडा नाही
दक्षिण भारताची ओळख केवळ इडली-वडा अशी नाहीए. भारतीय चित्रपटसृष्टीत दक्षिणेचा मोठा वाटा आहे. राम चरण, प्रभासस अल्लू अर्जुन, रजनीकांत, महेश बाबू, विजेंद्र प्रसाद, मोहनलाल, मणिरत्नम, ए आर रहमान, चिरंजीवी, नागर्जुन, एसएस राजामौली असे एकाहून एक सरस सुपरस्टार दक्षिणात्या चित्रपटसृष्टीने दिले आहेत.
दक्षिणात्य परंपरेची चेष्टा
अनेक बॉलिवूड चित्रपटात दक्षिणात्य परंपरेची चेष्टा करणारे प्रसंग दाखवण्यात येतात. . 'पड़ोसन, 'रा.वन' पासून 'चेन्नई एक्सप्रेस' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये खिल्ली उडवणारे प्रसंग दाखवण्यात आले आहेत. 'अईअईओ', 'माइंड इट' और 'अन्ना रास्कल' सारखे डायलॉग केवळ विनोदासाठी अभिनेत्याच्या तोंडी दिले जातात. 'किसी का भाई किसी का जान' चित्रपटातील 'लुंगी डांस' वर वाद झाला होता.
साऊथने शाहरुखला भरपू दिलंय
शाहरुख खानला दक्षिणेचं नेहमीच भरभरून प्रेम मिळालं आहे. 1998 मध्ये मणिरत्नम यांच्या 'दिल से' मध्ये शाहरुख खानने प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाने दोन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते. पद्मभूषक अभिनेते कमल हसन यांच्याबरोबर शाहरुखने 'हे राम' चित्रपटात काम केलं आहे. 2009 मध्ये प्रदर्शित झालेला शाहरुखचा बिल्लू बार्बर हा चित्रपट साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केला होता. गेल्याच वर्षी प्रदर्शित झालेला जवान या चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर-डुपर हिट झाला. हा चित्रपट एटलीने दिग्दर्शीत केला होता.