Brahmastra चित्रपटाबाबत करण जोहरचा गौप्यस्फोट, म्हणाला बॉलिवूडमधले काही जण...
ब्रम्हास्त्र चित्रपटाची बॉक्सऑफिसवर दमदार कमाई पण... करण जोहरने केला खुलासा
Karan Johar On Brahmastra : रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia bhatt) यांची प्रमुख भूमिका असलेला आणि अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्र कBrahmastra) या चित्रपटाने जगभरात दमदार कमाई केली आहे. एकीकडे काही चित्रपटांना #boycotttraind चा फटका बसला असताना ब्रम्हास्त्र चित्रपटाने मात्र जगभरात तब्बल 425 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 2022 या वर्षात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपटाचा मानही ब्रम्हास्त्रने पटकावला आहे. प्रदर्शन होण्या आधीपासून हा चित्रपट चर्चेत होता.
दरम्यान ब्रम्हास्त्र चित्रपटाचा निर्माता करण जोहर (Karan Johar) याने मोठा खुलासा केला आहे. या चित्रपटाने चांगलं प्रदर्शन करु नये असं बॉलीवूडमधल्याच (Bollywood) काही लोकांना वाटत होतं, हा चित्रपट बॉक्सऑफीसवर (Box Office) आपटला असता तर या लोकांना सेलिब्रेट करण्याची संधी मिळाली असती असं करण जोहरने म्हटलं आहे. तसंच या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अनेक रात्र आपण नीट झोपू शकलो नव्हतो असंही करण जोहरने म्हटलंय.
'प्रदर्शनापूर्वी झोपलो नाही कारण'
बॉलिवूडमध्ये बॉयकॉट ट्रेंड होता, त्यामुळे ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आपण खूप तणावाखाली होतो, अनेक रात्र झोपू शकत नव्हतो आणि ही गोष्ट रणबीर आणि आलियाही सांगता येत नव्हती असं करण जोहरने म्हटलं आहे. त्यामुळे चित्रपटातील कलाकारांसोबतच करण जोहरने चित्रपटाच्या प्रमोशनवर लक्ष दिलं. रणवीर कपूरने दक्षितेल्या काही कलाकारांसोबतही या चित्रपटाचं प्रमोशन केलं.
बॉलिवूडमधील काही जण विरोधात
लोकांची या चित्रपटाबद्दल काय प्रतिक्रिया असेल हे प्रदर्शनापूर्वी आम्हाला माहित नव्हतं, पण बॉलिवूडमधलेच काही जण या चित्रपटाबाबत नकारात्मक होते. हा चित्रपट बॉक्सऑफिसवर कमाई करुन अये असं काही जणांना वाटत होतं. चित्रपटावर टीका करा पण चित्रपटाबद्दल नकारात्मक भूमिका घेणं चांगली गोष्ट नसल्याचं करण जोहरने म्हटलंय. करण जोहरचा रोख नेमका कोणाकडे होता याबाबत मात्र त्याने कोणाचीही नावं घेतली नाहीत. पण नुकतंच कंगना राणौत आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता.
ब्रम्हास्त्रची दमदार कमाई
बॉयकॉट ट्रेंडनंतरही ब्रम्हास्त्रने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. चार आठवड्यात या चित्रपटाने 425 कोटींची गल्ला जमवलाय. 2002 या वर्षात सर्वाधिक कमाई करणारा पहिला हिंदी चित्रपट तर तिसार भारतीय चित्रपट ठरला आहे. कमाईच्या आकड्या ब्रम्हास्त्रच्या आधी एसएस राजामौली यांच्या आरआरआर आणि केजीएप चॅप्टर 2 यांचा नंबर लागतो.