Uorfi Javed: उर्फीचं नाही तर `या` मॉडेल्सनेही केलीये विचित्र फॅशन, पाहून माराल डोक्याला हात !!!
World`s Weirdest Fashion: जगभरात अशा फॅशन शोजमध्ये मोठ्या प्रमाणात अशा फॅशनला फॉलो करणारे फॉलोअर्स आहेत. यासाठी तितकाच मोठा खर्च आणि बिझनेस चालवला जातो.
World's Weirdest Fashion: सध्या उर्फी जावेदनं (Uorfi Javed) आपल्या विचित्र आणि विक्षिप्त फॅशननं सोशल मीडियावर वेगळाच ट्रेण्ड सेट केला आहे. उर्फी ही सोशल मीडियावर तूफान (Uorfi Javed Fashion) व्हायरल होत असते तिच्या अशा जगावेगळ्या फॅशनमुळे तुम्हीही तोंडात बोटं घालत असतात. त्यामुळे आपल्यालाही तिच्या अशा फॅशनमुळे हसावं की रडावं हे काहीचं कळतं नाही. परंतु उर्फी तर एक निमित्त आहे. उर्फी ही काही पहिलीच अश्या पद्धतीची फॅशन करणारी पहिली मुलगी नाही तर याआधीही अशाप्रकारे जागतिक पातळी विचित्र आणि विक्षिप्त फॅशनचा अवलंब केला गेला आहे. चला तर मग कोणकोण आहेत ते अवलिया ज्यांनी अशी विक्षिप्त फॅशन फॉलो केली आहे... (Entertainment news not uorfi javed but these are the weirdest fashion that has been followed throughout the world)
चला तर मग सुरूवात करूया फॅशन शोजपासून. फॅशन शो हा असा एक पायंडा आहे जिथून मोठमोठ्या फॅशन डिझायरनर्सकडून हटके आणि त्याहूनही विक्षिप्त फॅशन फॉलो केली जाते. जगभरात अशा फॅशन शोजमध्ये मोठ्या प्रमाणात अशा फॅशनला फॉलो करणारे फॉलोअर्स आहेत. यासाठी तितकाच मोठा खर्च आणि बिझनेस चालवला जातो.
सर्वप्रथम जाऊया लंडन फॅशन वीकमध्ये. येथे फॅशन डिझायनर जॅक अर्विंग (Jack Irving) यांचे कलेक्शन पाहून तुम्हालाही धक्का बसेल. त्यांच्या कलेक्शनमधून उर्फीनं आत्ताच केलेल्या फॅशनच्या पुढची फॅशन पाहायला मिळते आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला होता. ही फॅशनही सगळीकडेच व्हायरल झाली होती. या फॅशनची प्रेरणा ही लेडी गागावरून घेण्यात आली होती. अगदी मोठ्यामोठ्या तुऱ्यांची ही फॅशन अनेकांना हास्यापदही वाटली होती.
हे झालं एखाद्या फॅशनवीकमधील उदाहरणं. परंतु अशी फॅशन कोणी रोजच्या जीवनात फॉलो करणार नाही. त्यासाठी एक वेगळीच हिम्मत लागते आणि जी उर्फीकडे आहे. रोजच्या दैनंदिन जीवनात ही मुलगी आपल्या फॅशननं सगळ्यांनाच हसून हसून वेड करत असते. त्यामुळे तिला सामान्य ट्रोलर्सच काय तिचे चाहतेही ट्रोल करताना दिसतात. फक्त उर्फीचेच लुक्स नाहीत तर आम्ही ज्या फॅशनबद्दल बोलतो आहोत ती फॅशन जगभरात अनेकदा व्हायरल होताना दिसते. अशा फॅशनवर चिक्कार मीम्सही तयार केले जातात त्याचबरोबर इन्टाग्राम आणि फेसबुकवर तर अशा फॅशनचे लुक्स हे अनेकदा व्हायरल होतानाही दिसतात, अनेकदा हे लुक्स सर्वसामान्यांचे मनोरंजनही करताना दिसतात.
अशा फॅशनची उदाहरणं ही एक नाहीत तर अनेक आहेत त्यामुळे यांच्यापैंकी काही थोडीच उदाहरणं आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. तुम्ही जर इंटरनेटवर शेअर केलंत तर तुमच्या लक्षात येईल की अशा प्रकारची फॅशन ही जगभरात फॉलो केली जाते. चला तर मग पाहूया यातील काही उदाहरणे :
तुम्ही या फोटोंमधून पाहू शकता की यात क्रिएटिव्ही तर आहेतच पण त्याचसोबत यामध्ये हासण्यासारखेही खूप आहे. त्याचसोबत अशा कपड्यांना तयार करण्यासाठी खूप मेहनतही करावी लागते अशावेळी ही फॅशन लोकल नाहीतर ग्लोबल झाली आहे.
(सर्व छाया - विविध स्त्रोत)