राखी सावंतच्या मदतीसाठी सलमान खान नेहमी पुढे का येतो? काय आहे दोघांचं नातं, जाणून घ्या
ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच आपल्या वक्तव्याने चर्चेत असते. पण राखी सावंतच्या पाठिशी भक्कम पाठिंबा आहे तो म्हणजे बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा.
Entertainment : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' अर्थात राखी सावंत (Rakhi Sawant) आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर (Social Media) ती नेहमीच चर्चेत असते. राखीला नुकताच मातृशोक झाला. तिच्या आईचं कर्करोग आणि ब्रेन ट्युमर या गंभीर आजारामुळे निधन झालं आहे. यातून सावरत नाही तोच कथित पती आदिलबरोबरच्या (Adil Khan) नातेसंबंधांवरुन ती चर्चेत आहे. आदिल खान दुर्रानी याच्याबरोबर 8 महिन्यांपूर्वी लग्न केल्याचा दावा (Rakhi-Adil Wedding) राखीने केला होता. याला काही दिवस उलटत नाहीत तोच तीने त्याच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत आदिलविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत मुंबईतील ओशीवरा पोलिसांनी आदिलला अटक केली.
राखीचं सलमान खानशी नातं
राखी सावंत आपल्य बोलण्यात नेहमी बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा (Salman Khan) उल्लेख करते. कारण सलमान खान तिच्या मदतीसाठी नेहमी धावून येतो. राखीला घरखर्च चालवण्याचा विषय असो की राखीची आई आजारी असातना तिच्या उपचारासाठी लागणारा खर्च असो, सलमानने प्रत्येकवेळी तिची मदत केली आहे. इतकंच काय तर सलमान होस्ट करत असलेल्या बिग बॉसमध्येही (Big Boss) ती अनेकवेळा दिसली आहे. या सर्व गोष्टींचा राखी आपल्या बोलण्यातून वारंवार उल्लेख करत असते.
सलमान मदतीला येतो धावून
आदिल दुर्रानी याने राखी सावंत बरोबर लग्न झालं नसल्याचं सांगितलं होतं, त्यावेळी सलमान खानने आदिलला फोन केला आणि आदिलने लग्नाचं स्विकार केलं, असं राखी सावंतने. 2022 मध्ये आदिल दुर्रानीशी लग्न केल्याचं दावा राखी सावंतने केला होता. त्यानंतर तीने आपलं नाव बदलून फातिमा असं ठेवलं.
राखीच्या आईचं नुकतंच निधन झालं. पण जेव्हा उपाचारांसाठी तिची आई रुग्णालयात दाखल होती, त्यावेळेस आईच्या उपचारासाठी सलमानने आर्थिक मदत केली. याची माहिती राखीने स्वत: दिली होती. राखी सलमानला आपला भाऊ मानते. जेव्हा कठिण प्रसंग असतो तेव्हा ती सलमानची आठवण काढते. राखीच्या आईचं निधन झालं त्यावेळी देखील राखी सलमानची आठवण काढत रडली होती.
राखी ड्रामा क्वीन
याआधी राखी सावंतने रितेश नावाच्या व्यक्तीशी गुपचूप लग्न केलं होतं. त्यानंतर बिग बॉस 15 मध्ये ती आपला पती रितेशबरोबर दिसली होती. या कार्यक्रमात रितेशने राखीबरोबर वाईट वर्तणूक केली. त्यामुळे सलमान चांगलाच संतापला होता, त्याने रितेशला चांगलंच धारेवर धरलं होतं. त्यानंतर रितेशने राखी सावंतला त्रास दिला नाही.
सलमान खानने राखी सावंतच्या कारकिर्दीबाबतही मोठी मदत केली आहे. नुकतीच राखी सावंत मराठी बिग बॉसमध्ये दिसली होती. त्याआधी तीने हिंदी बिग बॉसमध्येही भाग घेतला होता. यासाठी तीने सलमान खानचे आभारही मानले होते. त्यामुळे सलमान खान आपल्या बहिणीसाठी वारंवार धावून येत असल्याचं पाहिला मिळतं.