`पुष्पा 2` च्या प्रदर्शनाची तारीख ठरली, आजपासून 100 दिवसांनी चित्रपटगृहात अल्लू अर्जुनचा धमाका
Pushpa 2 Release Date : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुचर्चित `पुष्पा- द रूल` या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर समोर आली आहे. निर्मात्यांनी नव्या पोस्टर्ससह चित्रटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे. आजपासून 100 दिवसांनी चित्रपटगृहात झळकणार आहे.
Pushpa 2 Release Date: दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) बहुप्रतिक्षित 'पुष्पा- द रूल' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर सस्पेन्स निर्माण झाला होता. या ना त्या कारणाने प्रदर्शनाची तारीख लांबली जात होती. त्यामुळे प्रेक्षकांनाही हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता लागली होती. आता प्रेक्षकांची ही उत्सुकता अखेर संपली आहे. निर्मात्यांनी 'पुष्पा- द रूल' (Pushpa 2 The Rule) चित्रपटाचं शानदर पोस्टर प्रदर्शित केलं असून यासोबत चित्रपटच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. 'पुष्पा- द रूल' च्या नव्या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन आपल्या आयकॉनिक पुष्पा राज अवतारात दाखवण्यात आला आहे.
कधी होणार चित्रपट प्रदर्शित
'पुष्पा- द रूल' च्या नव्या पोस्टरवर एक टॅगलाईन देण्यात आली आहे, '100 दिवसात नियम पहा'. म्हणजेच हा चित्रपट आजपासून 100 दिवसांनी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. नव्या पोस्टरमध्ये पु्ष्पा आणि भंवर सिंह यांच्यातील अॅक्शन दाखवण्यात आली आहे.
चित्रपटाचं पोस्टर माइथ्री मूव्ही मेकर्सच्या सोशल मीडिया हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. यात 100 डेज टू गो #Pushpa2TheRule असं कॅप्शन देण्यात आलं आहे. यानुसार #Pushpa2TheRule हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 मध्ये देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
'पुष्पा- द राइज' बॉक्स ऑफिसवर हिट
अल्लू अर्जुनचा पहिला पुष्पा द राइज हा चित्रपट बॉक्सऑफिसवर तुफान हिट झाला होता. दमदार अॅक्शन आणि थिरकायला लावणाऱ्या गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या चित्रपटाचे डायलॉगही तुफान हिट झाले होते.' पुष्पा, पुष्पराज झुकेगा नही साला' या डायलॉगने तर इतिहास रचला. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर सिक्वेलकडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे 'पुष्पा- द रूल' या चित्रपटाबद्दल लोकांची उत्सुकता वाढली आहे.
'पुष्पा 2' ची स्टार कास्ट
'पुष्पा- द रूल' या चित्रपटात अल्लू अर्जुन हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिक्वलमध्ये पुष्पा आणखी आक्रमक रुपात दिसणार आहे. याशिवाय रश्मिका मंदाना पुन्हा आपला गावरान अंदाज दाखवण्यासाठी सज्ज झालीय.