Aditya Singh Rajput Dead : प्रसिद्ध अभनेता, मॉडल आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंग राजपूत (Aditya Singh Rajput) याचा मृत्यू झाला आहे. सोमवारी त्याच्या राहात्या घरात त्याचा मृतदेह (Deadbody) आढळल्याने खळबळ उडाली आहे. आदित्य हा मुंबईतल्या अंधेरी (Mumbai Andheri) इथं राहात होता. इमारतलीच्या अकराव्या मजल्यावर असलेल्या घरातील बाथरुममध्ये आदित्यचा मृतदेह आढळला. आदित्यचा मित्र दुपारी त्याला भेटण्यासाठी गेला असता आदित्य बाथरुममध्ये पडलेला दिसला. त्याने इमारतीच्या वॉचमेनच्या मदतीने आदित्यला रुग्णालयात उपचारासाठी नेलं. पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अंमलीपदार्थांच्या अतिसेवनाने (Drug Overdose) आदित्यचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण आह आदित्य सिंग राजपूत?
आदित्या सिंग राजपूत ही हिंदी इंडस्ट्रीतला प्रसिद्ध चेहरा आहे. आदित्यने मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्याने काही चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्येही काम केलं. त्यानंतर त्याने कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु केलं होतं. त्याने अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना हिंदी चित्रपटसृष्टीत लाँट केलं होतं. 


सतत हसतमुख असणाऱ्या आदित्यच्या अचानक जाण्याने इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीत राहाणाऱ्या आदित्यने मॉडलिंग क्षेत्रात बरंच काम कमावलं होतं. त्याने 'क्रांतिवीर' आणि 'मैने गांधी को नही मारा' या हिंदी चित्रपटातही अभिनय साकारला होता. याशिवाय जवळपास 300 जाहीरांतीमध्ये त्याने काम केलं आहे. टीव्हीरचा स्प्लिट्सविलाया रियालटी शोमधून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. 



ग्लॅमरच्या दुनियेतील ओळखीचा चेहरा
ओटीटीवरील 'गंदी बात' या वेबसीरिजमध्ये (Web Series) आदित्यने काम केलं होतं. गेल्या काही काळापासून आदित्य राजपूत एका प्रोडक्शन हाऊससाठी (Production House) काम करत होता. यात तो कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम पाहात होता. ग्लॅमरच्या दुनियेतील तो ओळखीचा चेहरा होता. अनेक पार्टीज आणि पेज-3 कार्यक्रमात तो सहभागी असायचा. 


17 व्या वर्षी कारकिर्दीला सुरुवात
आदित्य सिंग राजपूतने वयाच्या सतराव्या वर्षी अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. आदित्यचा जन्म दिल्लीत झाला पण त्याचं कुटुंब हे मुळचं उत्तराखंडमधलं. आदित्यच्या कुटुंबात आई-वडिल आणि एक बहिण आहे. बहिण लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली आहे. आदित्य अभ्यासतही हुशार होता. शिक्षण संपल्यानंतर त्याने अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केला. पण त्याला मनासारखी नोकरी मिळाली नाही. यानंतर त्याने मुंबईत येऊन कारकिर्द घडवली.