TMKOC : छोट्या पडद्यावरील सर्वात प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चष्माला (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) आता 14 वर्ष पूर्ण झालीत. या तेरा वर्षात मालिकेची प्रसिद्धी आजही कायम आहे. या प्रवासात अनेक कलाकारांनी साथ सोडली तर अनेक कलाकार आजही या मालिकेत काम करत आहेत. काही कलाकार असे होते जे पाच ते पाच एपिसोडमध्येच दिसले, पण आपल्या अभिनयामुळे ते कायमचे लक्षात राहिले. याच कलाकारांमधलं एक नाव म्हणजे टीना (Tina). टीना के पात्र तारक मेहतामध्ये काही एपिसोडमध्येच दिसलं होतं. यात टप्पूचा (Tapu) बालविवाह दाखवण्यात आला आहे आणि टीना या पात्राने टप्पूच्या पत्नीची भूमिका साकारली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय होता एपिसोड
तारक मेहताच्या या एपिसोडमध्ये चंपकचाचा (Champak Chacha) आणि दयाबेव (Daya ben) 8 वर्षांच्या टप्पूच्या लग्नाचा घाट घालतात. टप्पूचं लग्न त्यापेक्षा लहान असलेल्या टीनाशी लावून देण्यात येतं. अर्थात हे सर्व जेठालालला (Jethalal) स्वप्नात दिसत असंत. पण हे एपिसोड लोकांच्या चांगलेच पसंतीत उतरले होते. पण आता आपण त्या एपिसोडबद्दल बोलणार नाही आहोत, तर त्या बालकलाकारबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जीने टीनाची भूमिका केली होती.



कोण आहे टीना?
टीनाची भूमिका साकारणाऱ्या या बालकलाकार मुलीचं खरं नवा आहे नूपुर भट्ट (Nupur Bhatt). नूपुर आता 22 वर्षांची झाली आहे. 1999 मध्ये जन्म झालेली नूपुर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपले अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचे हजारो फॉलोअर्स आहेत. खऱ्या आयुष्यातही नूपुर खूपच स्टाइलिश आहे. नूपुर उत्तर डान्स करते आणि आपल्या डान्सचा व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. याशिवाय नूपुरला ट्रॅव्हलिंगची आवड आहे. ट्रॅव्हलिंग दरम्यानचे फोटही ती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकत असते.



13 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन
तारक मेहता का उल्ट चष्मा देशातील सर्वात जास्त काळ चाललेली एकमेव मालिका आहे. 28 जुलै 2008 साली या मालिकेला सुरुवात झाली. सोमवार ते शनिवारी प्रसारित होणाऱ्या या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीतही नेहमीच बाजी मारली आहे. या मालिकेतील अनेक कलाकारांनी आपल्या वैयक्तिक कारणामुळे मालिकेला सोडचिठ्ठी दिली आहे. पण मालिकेवरचं प्रेक्षकांचं प्रेम जराही कमी झालेलं नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात घराघरात या मालिकेने लोकप्रियता कमावली आहे. अभिनेता दिलीप जोश या मालिकेत जेठालालच्या प्रमुख भूमिकेत आहेत. तर त्यावेळचा टप्पू म्हणजे भव्य गांधी आणि दयाबेन म्हणजे दिशा वकानी यांनी या कार्यक्रमातून ब्रेक घेतला आहे.