Urfi Javed Threat: सोशल मीडियावर आपल्या अतरंगी कपड्यांमुळे उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच चर्चेत असते. तिच्या कपड्यांमुळे अनेकवेळा तिला ट्रोल (Troll) करण्यात येतं. तर अनेकवेळा तिला धमकी देण्यात आली आहे. आता जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप तीने केला आहे. यासंदर्भात उर्फीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने तिला बेदम मारहाण करुन हत्या (Death Threat) केली पाहिजे अशी धमकी दिली आहे. एका डायरेक्टरच्या कार्यालयातून हा कॉल करण्यात आल्याचा तिचं म्हणणं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डायरेक्टरच्या कार्यालयातून फोन
डायरेक्टर नीरज पांडे यांच्या कार्यालयातून एका व्यक्तीने धमकीचा फोन केल्याचं उर्फीने म्हटलं आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण डायरेक्टर नीरज पांडे (Director Neeraj Pandey) यांचा सहाय्यक असून तुला एका स्क्रीप्ट संदर्भात भेटायचं आहे असं सांगितलं. यावर आपण त्या व्यक्तीकडून प्रोजेक्टची संपूर्ण डिटेल्स आधी पाठवा असं सांगितलं, यावर त्या व्यक्तीला राग आला. नीरज पांडेचा अपमान करण्याची तुझी हिम्मत कशी झाली असं त्या व्यक्तीने सुनावलं. 


इतकंच नाही तर त्या व्यक्तीने तुझ्याबाबतीत सर्व माहिती आहे, तुझ्या गाडीचा नंबर मला माहित आहे, तुला बेदम मारहाण करुन तुझी हत्या केली पाहिजे, त्याच लायकीची आहेस, कारण तू वाईट कपडे घालतेस, अशी धमकीही दिली. केवळ त्या व्यक्तीची भेट न घेतल्याने त्याने धमकी दिल्याचा आरोप उर्फीने केला आहे. दिग्दर्शक नीरज पांडे यांनी याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 'बेबी' आणि 'स्पेशल 26' हे नीरज पांडे यांचे गाजलेले चित्रपट आहेत. 


याआधीही उर्फीला धमकी
उर्फी जावेला गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातही एका व्यक्तीने धमकी दिली होती. या व्यक्तीने अपशब्दांचा वापर करत तिला बलात्काराची धमकी दिली होती. याव्यक्तीचं नाव नवीन गिरी असल्याचं समोर आलं होतं. या व्यक्तीविरोधात 354A, 354D, 506(2) आणि 509 कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


याआधीही अनेकवेळा उर्फी जावेदला बलात्काराची आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. उर्फीच्या कपडयांवरुन तिला अनेकवेळा वादाला सामोरं जावं लागलं आहे. लेखक चेतन भगत यांनी उर्फीच्या कपड्यांवरुन कमेंट केली होती, याची चांगलीच चर्चा झाली होती. उर्फीने चेतन भगत यांना सडतोड उत्तर दिलं होतं. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही उर्फी जावेदच्या कपड्यांवर टीका करत तिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.