Entertainment : ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान (Waheeda Rehman) यांना दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली. वहिदा रहमान यांचं सिनेसृष्टीत 5 दशकांचं योगदान आहे. याआधी वहिदा रेहमान यांचा पद्मभूषण, राष्ट्रीय पुरस्कारानं गौरव करण्यात आला आहे. आता सिनसृष्टीतील सर्वोच्च पुरस्काराने त्यांना गौरवलं जाणार आहे. 85 वर्षांच्या वहिदा रेहमान यांनी हिंदी चित्रपटसष्टीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा सर्वोच्च पुरस्कार
85 वर्षांच्या वहिदा रेहमान (Waheeda Rehman) यांनी अनेक वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीत काम केलं आहे. ब्लॅक अँड व्हाईट जमान्यापासून रंगीत दुनियेपर्यंत वहिदा रेहमान यांनी आपल्या अभियनाची छाप उमटवली आहे. आपल्या मोठ्या कारकिर्दीत वहिदा रेहमान या त्यावेळच्या दिग्गज अभिनेंत्रींपैकी एक होत्या. त्यावेळचे अभिनेते देव आनंद, राज कपूर, राजकुमार, मनोज कुमार आणि सुनील दत्त अशा नावाजलेल्या अभिनेत्यांबरोबर वहिदा रेहमान यांनी काम केलं आहे. वहिदा रेहमान यांनी साकारलेल्या अनेक भूमिका अजरामर झाल्या. 


चेन्नईत जन्म
वहिदा रेहमान यांचा 3 फेब्रुवारी 1938 रोजी चेन्नईमध्ये झाला. 1955 मध्ये त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सीआयडी या त्यांचा पहिला हिंदी चित्रपट. विशेष म्हणजे आपल्या कारकिर्दीची सुरुवात वहिदा रेहमान यांनी नकारात्मक भूमिकेपासून केली. पण त्यांच्या या भूमिकेचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं. वहिदा रेहमान आणि गुरुदत्त यांची जोडी स्क्रिनवर लोकांना आवडू लागली. या जोडीने अनेक हिंदी चित्रपटात काम केलं. 'प्यासा', 'कागज के फूल', 'चौदहवी का चांद' आणि 'साहब बीवी और गुलाम' हे वहिदा रेहमान यांचे चित्रपट चांगलेच गाजले. 


अनुराग ठाकूर यांनी केलं कौतुक
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा केली. अनुराग ठाकूर यांनी वहिदा रेहमान यांचं कौतुक करणारी पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटंलय 'यावर्षीचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना चित्रपटसृष्टीतील त्यांच्या शानदार योगदानाबद्दल जाहीर केला जात आहे. हा पुरस्कार जाहीर करताना मला खुप आनंद होत आहे. वहिदा रेहमान यांनी आपल्या दमदार अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीवर आपली छाप उमटवली आहे. असं अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे.