Airtel Girl Sasha Chettri: टीव्हीवर, चित्रपटात दररोज विविध प्रोडक्ट्सच्या अनेक जाहीराती (Advertisement) झळकत असतात. पण त्यातल्या वेगळेपणामुळे त्यातल्या काहीच जाहीराती आणि त्यात काम करणारे कलाकार लक्षात राहातात. अशीच एक जाहारीत होती एअरटेलची. 'इससे फास्ट कहीं नेटवर्क मिले तो लाइफटाइम मोबाइल बिल फ्री' असं बोलणारी मुलगी एअरटेल 4G गर्ल (Airtel Ad Girl) म्हणून ओळखली जाऊ लागली. एअरटेलच्या जाहीरातीत झळकलेली ही मुलगी रातोरात स्टार बनली. या मुलीचे मोठमोठे होर्डिंग्ज रस्त्यारस्त्यावर दिसू लागले. छोट्या पडद्याच्यामाध्यमातून ती घराघरात पोहोचली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण आहे एअरटेल गर्ल
'एयरटेल 4 जी गर्ल' नावाने प्रसिद्ध झालेली या मुलीचं नाव आहे साशा छेत्री (Sasha Chettri). साशा उत्तराखंडमधल्या देहारदून इथं राहाणारी आहे. साशाने देहरादूनमधूच आपलं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण संपल्यानंतर साशा मुंबईत आली. मुंबईत तीने जाहीरातीशी संबंधित शिक्षण घेतलं. त्यानंतर तीने एका अॅड एजन्सीतत कॉपीरायटर म्हणून कामाला सुरुवात केली. एकदा अचानक साशाला एअरटेलच्या जाहीरातीसाठी फोन आला. सुरुवातीला तीला आपल्याबरोबर कोणतही मस्करी करत असल्याचं वाटलं.


साशाचं नशिब खुललं
2015 मध्ये साशाने एअरटेलची पहिली जाहीरात केली. ही जाहीरात इतकी प्रसिद्ध झाली की साशा पहिल्याच जाहीरातीत लोकांच्या मनात आणि प्रत्येक घरातो पोहोचली. यानंतर एअरटेल कंपनीच्या पुढच्या प्रत्येक जाहीरातीत ती झळकली. एअरटेलला एका अशा चेहऱ्याची गरज होती जो लोकांच्या फारसा परिचीत नव्हता. साशाच्या रुपाने त्यांना एअरटेल कंपनीला असा चेहरा मिळाला.


साशाने चित्रपटातही केलं काम
जाहीरातीनंतर साशाला चित्रपटांचीही ऑफर आली. कट्टी बट्टी या चित्रपटात तीने भूमिका साकारली. पण हा चित्रपट फारसा चालला नाही. त्यानंतर साशाने दक्षिणेकडे आपला मोर्चा वळवला. दक्षिणेत तीने काही चित्रपटात छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. 2022 मध्ये 'राधे श्याम' चित्रपटात शेवटचं काम केलं.


साशा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह
साशा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय होती, पण आता सोशल मीडियापासूनही ती दूर आहे. तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेवटची पोस्ट 17 सप्टेंबर 2022 ची आहे. त्यामुळे साशा सध्या काय करते, ती कुठे आहे असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय.