मुंबई : अभिनेत्री एरिका फर्नांडिसचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.  एकता कपूरची लोकप्रिय टीव्ही मालिका 'कसौटी जिंदगी की 2'  प्रेक्षकांच्या खूपच पसंतीत उतरला आहे. एरिका या मालिकेतील कलाकार. एरिका मालिकेच्या सेटवर घाघरा न घालताच गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालिकेचा दिग्दर्शक एरिकाला शॉटकरता बोलवतो. दिग्दर्शकाचा आवाज ऐकून एरिका लगेच मेकअप रूममधून बाहेर येते. आपण तयार असून शॉर्ट रेकॉर्ड करू असं दिग्दर्शकाला सांगते. तेव्हा दिग्दर्शक आणि सेटवरील इतर मंडळी पाहतच राहिले. सुरूवातीला एरिकाला नेमकं काय झालं हे समजलं नाही. ती साऱ्यांना विचारत झाली की, काय झालं? तेव्हा.... 



दिग्दर्शक तिला सांगून गेले की,'तूझा घाघरा कुठे आहे?' यानंतर एरिकाचा चेहरा बघण्यासारखा आहे. एरिका यावेळी फक्त ओढणी घेऊन मेकअप करून सेटवर येते. घाघरा घालायला विसरलेल्या एरिकाने व्हि़डिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 



व्हिडिओवर चाहत्यांचे फनी कमेंट येत आहेत. एरिका 'कसोटी जिंदगी के 2' मध्ये प्रेरणाचं पात्र साकारत आहे. तिच्या अभिनयाने प्रेक्षक आणि मालिकेतील इतर कलाकार सगळेच खूष आहेत.  व्हिडीओ शेअर करताना एरिकानं लिहिलं, ‘यावेळी दिग्दर्शकाचा हुकूम.’ या व्हिडीओवर प्रेक्षक वेगवेगळ्या कमेंट करताना दिसत आहेत. काही नेटीझन्सनी एरिका खूपच विनोदी असल्याचं म्हटलं आहे. तर मी हसून हसून मरेन, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील केल्या आहेत.