ईशा देओलचा `मिराया`सोबत पहिला फोटो व्हायरल
ईशा आणि भरतने १० जून २०१९ या दिवशी त्यांच्या दुसऱ्या राजकन्येचं स्वागत केलं.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओलने तिच्या दुसऱ्या मुलीला जन्म दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून ईशाने पुन्हा एकदा आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ईशा आणि तिचा पती भरत तख्तानी यांनी १० जून २०१९ या दिवशी त्यांच्या दुसऱ्या राजकन्येचं स्वागत केलं. सोबतच ईशाने तिच्या दुसऱ्या मुलीचं नाव मिराया ठेवल्याचंही सांगतिलं. नुकताच ईशा देओलच्या मुलीचा पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये ईशा तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसत आहे.
ईशा आणि भरत तख्तानी रुग्णालयातून बाहेर पडतानाचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ईशाजवळ मोठी मुलगी राध्या तर भरतजवळ त्यांची छोटी मुलगी मिराया दिसत आहे. ईशाने 'भरत आणि मी अतिशय खूश असल्याचं' म्हटलंय.
भरतनेही 'मी अतिशय खूश आहे. माझी मुलगी मिराया ईशा सारखी दिसते तर राध्या माझ्यासारखी दिसते. मला अतिशय आनंद होतोय की, माझ्या दोन्हीही मुलींचे चेहेरे आमच्यासारखेच दिसत असल्याचं' भरतने म्हटलंय.
सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम सक्रिय असणाऱ्या ईशाने एक पोस्ट लिहित आपल्या मुलीचं या जगात स्वागत करत तिचं नावही सांगितलं. त्यासोबतच चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत तिने सर्वांचेच आभारही मानले.
ईशा आणि भरत तख्तानी २०१२ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. काही वर्षांनी त्यांना राध्या या त्यांच्या पहिल्या मुलीचं स्वागत केलं.