`मी त्याला गर्दीतून बाहेर काढलं आणि...`, भर कार्यक्रमात चुकीचा स्पर्श करणाऱ्या पुरुषाला ईशा देओलनं असा शिकवला धडा
Esha Deol : ईशा देओलनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेल्या या घटनेविषयी सांगितलं आहे.
Esha Deol : सेलिब्रिटी म्हटलं की त्यांचे लाखो चाहते येतात. त्यांचे चाहते अनेकदा अशा काही गोष्टी करून जातात ज्यानं सगळ्यांना आश्चर्य होते. कधी कोणी त्यांना भेटण्यासाठी दुसऱ्या राज्यातून मुंबईपर्यंत चालत येतं तर कधी कोणी भलत्याच काही गोष्टी करतं. बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओलसोबत देखील असंच काहीसं झालं आहे. ईशाचे आजही लाखो चाहते आहेत. तिला भेटण्यासाठी तिचे चाहते फार उत्सुक असतात, पण तुम्हाला माहितीये का एकदा एका चाहत्यानं सगळ्या हद्द पार केल्या आहेत. त्यानं चक्क तिचा हात धरून तिला खेचलं आणि त्यानंतर जे काही झालं ते अनपेक्षित होतं.
ईशानं बॉलिवूडमध्ये 'कोई मेरे दिल से पूछे' या चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर ती 'धूम', 'न तुम जानो न हम', 'कुछ तो है' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. ईशा, भरत तख्तानीसोबतच्या घटस्फोटामुळे ईशा चर्चेत आली होती. या सगळ्यात आता ईशानं एका मुलाखतीक स्वत: सोबत घडलेल्या एका घटनेविषयी सांगितलं. त्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसला होता. एका चित्रपटाच्या प्रीमियरवर ईशानं एका चाहत्यानं तिला चुकीचा स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं. त्यानंतर ईशानं त्याला चांगलीच अद्दल घडवल्याचे देखील सांगितले.
ईशानं 'द मेल फेमिनिस्ट' च्या एका एपिसोडमध्ये दिलेल्या एका मुलाखती दरम्यान, तिच्यासोबत झालेल्या छेडछाडच्या घटनेला आठवलं. ईशानं सांगितलं की ही घटना 2005 मध्ये पुणेमध्ये दस या चित्रपटाच्या प्रीमियरच्या कार्यक्रमा दरम्यान, जिथे संजय दत्त, सुनील शेट्टी, जायद खान आणि अभिषेक बच्चनसोबत त्यांचे सह-कलाकार देखील उपस्थित होते. बाऊंसर असले तरी इतक्या गर्दीत एका पुरुषानं तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला आणि हे तेव्हा झालं जेव्हा कार्यक्रमात ती एन्ट्री करणार होती.
ईशानं याविषयी सांगितलं की 'जेव्हा मी एन्ट्री करत होते, तेव्हा माझ्या आजुबाजूला अनेक बाउंसर होते, तेव्हाच गर्दीतून एका पुरुषानं मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला. त्यानंतर मी इथेतिथे काही पाहिलं नाही आणि मी थेट त्या व्यक्तीला धरलं आणि त्याला त्या गर्दीतून बाहेर काढलं. त्यानंतर सगळ्यांसमोर मी त्याच्या कानशिलात लगावली.'
ईशानं पुढे ती या घटनेकडे दुर्लक्ष का करू शकली नाही याविषयी देखील तिनं सांगितलं. ईशानं सांगितलं की 'मी खूप जास्त रागवणारी किंवा चिडणारी व्यक्ती नाही, पण जर कोणी सगळ्या हद्द पार करून काही करत असेल तर त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहत नाही. अशा परिस्थितीत महिलांनी बोलायला हवं. फक्त त्यासाठी नाही की पुरुष हे शारीरिकदृष्ट्या जास्त स्ट्रॉंग आहेत, याचा अर्थ हा नाही की ते आमचा फायदा उचलू शकतात. माझं मत आहे की महिला या भावनिकदृष्ट्या खूप जास्त मजबूत असतात आणि आम्ही अशा प्रकारचं गैरवर्तन हे सहन करायला नको.'