मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल आणि भारत तख्तानी यांनी दुसऱ्यांदा गुड न्यूज असल्याचे सांगत सोशल मीडियावरून एक फोटो शेअर केला आहे. एका वेगळ्या अंदाजात ईशाने तिच्या मुलीचा राध्याचा एक फोटो शेअर करत 'बिग सिस्टर' असं कॅप्शन दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशा देओल आणि भारत तख्तानी यांचा डिसेंबर २०१२ रोजी विवाह पार पडला होता. त्यानंतर २०१७ रोजी त्यांना कन्यारत्न झाले. ईशाने राध्याचा फोटो सोशल मिडियावर शेअर करत 'I am being promoted to big sister'असे म्हटले आहे. ईशाच्या या पोस्टला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून तिचे अभिनंदन केले जात आहे. 



ईशाने तिचा आणि भारतचा आणखी एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये ईशाचे बेबी बंम्पही दिसत आहे. त्या फोटोवर चाहत्यांनी ईशाला गरोदर असल्याचेही विचारले आहे. त्या फोटोवरही चाहत्यांकडून अभिनंदन केले जात आहे.