Esha Deol on Marriage : बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचा नुकताच घटस्फोट झाला आहे. 12 वर्षाच्या सुखीसंसारानंतर ईशा आणि भरत यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ईशानं तिनं लिहिलेल्या पुस्तकात लग्नानंतर तिचं आयुष्य कसं बदललं याविषयी देखील लिहिलं आहे. इतकंच नाही तर लग्नानंतर ती शॉर्ट्स घालून फिरू देखील शकत नव्हती. इतकंच नाही तर ईशाला त्यावेळी जेवन बणवता येत नव्हतं. शिवाय मुलीच्या जन्मानंतर ईशाच्या आयुष्यात आणखी काय बदल झाले याविषयी देखील तिनं सांगितलं आहे. खरंतर ईशाच्या घटस्फोटानंतर तिच्या पुस्तकातील अनेक गोष्टी या चर्चेत आल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशा देओल आणि भरत तख्तानी या दोघांनी मिळून 12 वर्षे जॉइन्ट स्टेटमेंट द्वारे त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली आहे. ईशा देओलविषयी बोलायचे झाले तर 'अम्मा मिया' हे ईशाचं पुस्तक 2020 मध्ये प्रकाशित झालं होतं. या पुस्तकात ईशा देओलनं लिहिलं की 2012 मध्ये आमचं लग्न झालं, त्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या. लग्नानंतर मी मच्युअर आणि जबाबदार झाले होते. मला माझ्या आयुष्यातील काही गोष्टी बदलाव्या लागल्या. जेव्हा मी भरतच्या कुटुंबासोबत राहू लागली तेव्हा मी शॉर्ट्स आणि टी-शर्टवर फिरू शकत नव्हते. जसं मी लग्नाच्या आधी घरात फिरायचे. मात्र, भरतचं कुटुंब हे सपोर्टिंग होतं. 



पुढे ईशानं सांगितलं की तख्तानी कुटुंबातील सगळ्या महिला या त्यांच्या नवऱ्यासाठी जेवणाचा डब्बा पॅक करायच्या. भरतशी भेटण्याआठी मी काहीच सांगितलं नाही. हो, मी सासूची आभारी तर नक्कीच आहे. ज्यांनी कधीच या गोष्टीवर भर दिली नाही की मी स्वयंपाक घरात जायलाच हवं. त्यांनी कधीच मला कोणत्या रुढी-परंपरां पाळण्यासाठी फोर्स केलं नाही. जे एका सुनेकडून अपेक्षित असतं. 


हेही वाचा : पहिला घटस्फोट, मग ब्रेकअप... आता सुष्मिता सेनच्या लेकीला डेट करतोय बिग बॉस विजेता?


'दिल्ली टाइम्स'नं दिलेल्या रिपोर्टनुसार, ईशा आणि भरतनं एक जॉइन्ट स्टेटमेंट त्यांच्या घटस्फोटाविषयी घोषित केलं. स्टेटमेंटमध्ये त्यांनी लिहिलं की 'आम्ही दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. खरंतर, आता आम्ही एकत्र नाही. मात्र, आमच्यासाठी आमच्या दोन्ही मुलाचं भविष्य खूप महत्त्वाचं आहे आणि कायम राहिल. आशा आहे की तुम्ही आमच्या प्रायव्हसीचा आदर कराल.'