मुंबई : ईशा देओल आणि अजय देवगणची, रुद्र - द एज ऑफ डार्कनेस ही सिरीज लोकप्रिय ब्रिटिश नाटकावर आधारित आहे, 'नो एंट्री'मध्ये अभिनेत्रीने लूथर टोटली रेडी ही भूमिका साकारली होती.  2012 मध्ये व्यापारी भरत तख्तानीशी लग्न केलं, त्यानंतर ती रुपेरी पडद्यापासून गायब झाली. अलीकडेच, ईशा देओलने चित्रपटांमध्ये काम करण्याऐवजी लग्नानंतर कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्याच्या तिच्या निर्णयाबद्दल उघड केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीदरम्यान ईशा देवोल म्हणाली की, 'असं नाही की मला काम मिळत नव्हतं. त्यावेळी मला काही प्रोजक्टही मिळालेही होते, पण त्यावेळी मी चित्रपट करायला फारसे उत्सुक नव्हते. लग्नानंतर लगेच माझं मुलांचं प्लॅनिंग होतं.  मला माझ्या कौटुंबिक जीवनाचा जास्तीत जास्त आनंद घ्यायचा होता.


आज जिथे बहुतांश अभिनेत्री लग्नानंतर चित्रपटात काम करत राहतात. ईशा लग्नानंतर आणि आई बनल्यानंतरही तिच्या निर्णयाबद्दल आनंदी आहे. ती म्हणाली, 'आज, मी परत येतेय कारण तो एक कॉल होता. जेव्हा मी शोबीज सोडलं, तेव्हा मला फक्त पत्नी आणि सून होण्याचा आनंद घ्यायचा होता. मला वाटतं की तेच ठीक होतं, कारण आम्हाला आमच्या वैयक्तिक आयुष्यासाठी वेळ देणे आवश्यक होतं. 


मला वाटतं की, आता अशी वेळ आली आहे जेव्हा मी बाहेर पडू शकते आणि मला पाहिजे ते काम निवडू शकते. मला वाटतं की, आता माझी वेळ आहे आणि मी त्याचा फायदा घेतला पाहिजे '. ईशा जवळपास एक दशकापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मात्र तिने 2019 मध्ये 'केकवॉक' नावाच्या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं. त्याचबरोबर या वर्षाच्या सुरुवातीला ती 'एक दुआ' चित्रपटातही दिसली.


ईशा मुलाखतीत पापाराझींबद्दल बोलली आणि म्हणाली, 'माझी मुलं माझा पती, कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी आहेत आणि मला त्यांना खासगी ठेवणं आवडतं. माझ्या मुलांचंही सामान्य बालपण असावं अशी माझी इच्छा आहे. जेव्हा आम्ही मोठे होत होतो, तेव्हा पापाराझी नावाची गोष्ट नव्हती. मोठ्या सुपरस्टारच्या मुली असूनही, आम्हाला बाहेर पडणं आणि काहीतरी करणं खूप सोपं होतं. त्यावेळी लोकं माझ्याकडे बोट करून म्हणायचे, 'ती धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी आहे.'