शनिवार, 20 एप्रिल रोजी, ईशा देओल आणि तिची बहीण अहाना देओल, लोकसभा निवडणूक 2024 च्या दरम्यान उत्तर प्रदेशातील मथुरा येथे प्रचारासाठी त्यांची आई हेमा मालिनी यांच्यासोबत सहभागी झाल्या. ईशा मथुरेतील पर्यटनाबाबत एएनआयशी बोलताना दिसली. मात्र, नेटिझन्सनी तिच्या ओठांची दखल घेतली आणि तिच्यावर लिप फिलर केल्याचा आरोप केला. तसेच ईशाला ट्रोल देखील करण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओ व्हायरल होताच एका यूझरने 'सगळं सोडा, ईशा देओलच्या ओठांना काय झालं?' एका नेटिझनने सांगितले की, 'सगळं लक्ष ईशाच्या ओठाकडे जात आहे.' अलीकडेच, अभिनेत्रीने लग्नाच्या 11 वर्षांहून अधिक काळानंतर पती भरत तख्तानीपासून वेगळी होऊन घटस्फोट घेतला आहे. एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतर ईशा आणि भरत मुलांसाठी मात्र एकत्र दिसणार आहे. मुलं ही आमचे प्राधान्य असणार असल्याचं त्यांनी सांगितले. 



ईशा देओलने केली ओठांची शस्त्रक्रिया?


ईशा देओल आणि तिची बहीण अहाना देओल यांना नुकतेच मथुरेला भेट देताना दिसले, दोघांनीही कपाळावर टिकली लावू पारंपारिक पोशाख घातलेला. ईशा तिच्या कुटुंबासोबत अनेक कार्यक्रमात सहभागी झाली होती. बांकेबिहारींनाही भेट दिली. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, या फोटोंमुळे अभिनेत्रीवरही जोरदार टीका होत आहे.


सोशल मीडियावर ट्रोल 


ईशा देओलचे ऑनलाइन फोटो, विशेषत: ओठ पाहून नेटिझन्सने आश्चर्य व्यक्त केले. कमेंटमध्ये एका यूजरने विचारले की, "ईशा देओलच्या ओठांना काय झाले?" दुसरा युझर्स म्हणाला, "अभिनेत्री लिप सर्जरी का करतात हे कधीच समजणार नाही. "ही शस्त्रक्रिया ईशावर अजिबात चांगली दिसत नाही. ती अगदीच निरुपयोगी दिसते. राजकारणात येण्यासाठी प्रतिमा आणि चेहरा दोन्ही बदलावे लागतात."


ईशा देओल शेवटची 'हंटर टूटेगा नहीं तोडेगा'मध्ये सुनील शेट्टी, बरखा बिश्त, करणवीर शर्मा आणि राहुल देव यांच्यासोबत दिसली होती. ईशा आणि भरत तख्तानी आधी आंतरशालेय स्पर्धेदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर 2012 मध्ये लग्न केले. त्यांना 'राध्या' आणि 'मिराया' या दोन सुंदर मुली होत्या. दुर्दैवाने, लग्नाच्या 12 वर्षानंतर, ईशा आणि भरत यांनी 6 फेब्रुवारी 2024 रोजी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.


हेमा मालिनी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात भरतच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या मीडियामध्ये पसरू लागल्या. '