मुंबई : बॉलिवूडची सुपरबोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता नेहमीच तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. मात्र यावेळी जेव्हा ही अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर आली तेव्हा तिला पाहून लोकं आश्चर्यचकित झाले. या अभिनेत्रीचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती हिरव्या रंगाच्या सूटमध्ये धुमाकूळ घालत आहे.  व्हिडिओ पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. कारमधून बाहेर पडताना कॅमेऱ्याकडे पाहून अभिनेत्री पोझ देऊ लागली. ईशा गुप्ताचा हा लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. त्यामागचं कारण आहे ईशा गुप्ताची बोल्ड इमेज.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिरव्या रंगाच्या सूटमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे
जेव्हा जेव्हा ईशा गुप्ता कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा तिचा फक्त बोल्ड लूकच पाहायला मिळतो. मात्र यावेळी अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर येताच तिच्या इंडियन लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे. मुंबई एअरपोर्टवर ईशा गुप्ता कारमधून खाली उतरताच तिने हिरव्या रंगाचा सूट घातलेला दिसला. तिचा हा लूक पूर्ण करण्यासाठी ईशाने केस मोकळे ठेवत अगदी हलका मेकअप केला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पापाराझींना पोझ दिल्या
ईशा गुप्ताचा हा लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आणि तिला पाहतच राहिले. खरंतर, ईशा गुप्ता बहुतांशी वेस्टर्न ड्रेसेजमध्ये कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याआधी ईशाला  बोल्ड लूकमुळे  ट्रोलिंगच्या निशाण्यावर आली होती. मात्र यावेळी ईशा गुप्ताने आपला असा इंडियन लूक  दाखवला आहे की, लोकांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण जात आहे.