मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या बॉबी देओलच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'आश्रम 3'मुळे चर्चेत आहे. ईशाने शोमध्ये बाबा निरालाची मॅनेजर सोनियाची भूमिका साकारली आहे. ईशा गुप्ता म्हणते की, अभिनयासाठी प्रोजेक्ट निवडण्याचं तिचे निकष काळानुरूप बदलले आहे. या शोचा एक भाग झाल्याबद्दल अभिनेत्रीने आनंद व्यक्त केला आणि प्रोजेक्ट निवडण्याचा स्वतःचा मार्ग देखील शेअर केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशा म्हणाली, 'मी माझ्या स्वतंत्र आयुष्याची सुरुवात अगदी लहान वयात केली आहे. असे दिवस होते जेव्हा मी माझा पॉकेटमनी मिळवण्यासाठी विद्यार्थी म्हणून कॅफेमध्ये काम केलं. पण आता इतक्या वर्षांनंतर माझ्याकडे एक पॅरामीटर आहे. माझ्या प्रोजेक्टमुळे माझ्या खिशाला किंवा माझ्या आत्म्याचं समाधान करावं लागेल.


जर मी असाइनमेंट किंवा कथेतून खूप पैसे कमवत नाही, एक भूमिका जी इतकी रोमांचक आहे की ती एक अभिनेत्री म्हणून मला आव्हान देते, तर ती करण्यात काय अर्थ आहे. देवाच्या कृपेने, मी चांगलं काम करत आहे आणि मी खरोखर माझे घर चालवण्यासाठी काम करत नाही. मी जीवनाच्या त्या टप्प्यावर आहे जिथे मी समाधान शोधत आहे.


जेव्हा तिला विचारलं की, ती ट्रोलर्सपासून अप्रभावित आहे का? तेव्हा ईशा उत्तर देत म्हणाली, 'ट्रोल करणारे फक्त चाहते आहेत, म्हणून ते माझ्या पोस्टवर कमेंट करत आहेत. ते माझ्यावर प्रेम करतात.' ईशाने आश्रम 3 मध्‍ये बॉबी देओलसोबत स्‍क्रीन शेअर केली. तिला कोणत्‍या अभिनेत्‍या आणि दिग्‍दर्शकांसोबत काम करण्‍याची आवड आहे याबद्दल विचारलं, ईशा म्हणाली, "आजकाल वेब सिरीजमध्‍ये ही काही उत्‍तम टॅलेंट पाहायला मिळतात.


त्यापैकी एक म्हणजे जयदीप अहलावत. तो इतका मनोरंजक अभिनेता आहे की मला त्याच्यासोबत काम करायचं आहे.' प्रकाश झा दिग्दर्शित, बॉबी देओल अभिनीत, 'आश्रम 3' एमएक्स प्लेयरवर प्रसारित झाली आहे.