मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.


अनेकांनी दिल्या शुभेच्छा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इटलीमध्ये दोघांनी विवाह केला. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. अनेक दिग्गजांनी त्यांना शुभेच्छा पाठवल्या. क्रिकेटर्स आणि बॉलिवूड कलाकारांसाठी २६ डिसेंबरला मुंबईत खास रिसेप्शन ठेवण्यात आलं आहे.


एक्स-ब्वॉयफ्रेंडची अशी प्रतिक्रिया


अनुष्का शर्माचा को-स्टार आणि कथित एक्स-ब्वॉयफ्रेंड असलेला अभिनेता रणवीर सिंहने देखील दोघांच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या विराट आणि अनुष्काच्या फोटोला त्याने फक्त लाईक केलं आहे. पण इतर कलाकारांसारखं त्याने कोणतंही ट्विट केलेलं नाही.


या सिनेमातून आले जवळ


रणवीर सिंहने त्य़ाच्या करिअरची सुरुवात अनुष्का शर्मा सोबत केली होती. 'बँड बाजा बारात' हा त्याचा पहिला सिनेमा होता. 'बँड बाजा बारात'नंतर यांची जोडी पुन्हा 'लेडिज वर्सेज रिक्की बहल'मध्ये जमली.


म्हणून झाला ब्रेकअप


रणवीर सिंह जेव्हा 'लुटेरा' सिनेमाच्या दरम्यान सोनाक्षी सिन्हाच्या जवळ आला. तेव्हा अनुष्का आणि रणवीरमध्ये दुरावा निर्माण झाला. नंतर रामलीलाच्या सेटवर रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणमध्ये जवळीक वाढली. आज अनुष्का आणि रणवीरचा जरी ब्रेकअप झाला असेल तरी दोघांमध्ये मैत्री मात्र कायम आहे.