मुंबई : गायिका नेहा कक्कर गेल्या काही दिवसांपासून तिच्या ब्रेकअपमुळे चांगलीच चर्चेत होती. अभिनेता हिमांश कोहली आणि नेहाने ब्रेकअपसाठी एकमेकांना कारणीभूत ठरवत सोशल मीडियावर संताप व्यक्त केला होता. मात्र अता त्यांचे मार्ग कायमचे वेगळे झाले आहेत. नेहा लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. नेहा गायक रोहनप्रीत सिंहशी लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. नेहाच्या या निर्णयावर तिचा एक्स बॉयफ्रेंड हिमांशू कोहलीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच डीएनएने हिमांशूशी संवाद साधल. जर नेहा तिच्या आयुष्यात पुढे जात असेल तर मी तिच्यासाठी आनंदी आहे असं तो म्हणाला. 'नेहा विवाहबंधनात अडकणार असेल तर मी फार आनंदी आहे. कारण ती मागच्या सर्व गोष्टी विसरून पुढे जात आहे. तिच्या आयुष्यात दुसरी कोणी  व्यक्ती आली आणि नेहा त्याच्यासोबत आनंदी आहे हे पासून मला आनंद झाला आहे’ असे हिमांशू म्हणाला.'


टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, नेहा आणि रोहनप्रीत या महिन्याच्या अखेरापर्यंत लग्न करणार आहेत. हे लग्न दिल्लीत होणार असून पेन्डेमिकच्या कारणामुळे यामध्ये खूप लोकांची उपस्थिती असणार आहे. मात्र रोहनप्रीतच्या मॅनेजरने हे सूत्र नाकारलं आहे. 


दोघांनी एकत्र व्हिडिओ केल्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा होत आहे. रोहनप्रीतचा सध्या तरी लग्न करण्याचा काही प्लान नाही. काही दिवसांपूर्वी रोहनप्रीत आणि नेहाने एक म्युझिक व्हिडिओ तयार केला आहे. यामध्ये नेहा, रोहनप्रीतशी लॉकडाऊनमध्ये लग्न करण्याबाबत बोलत आहेत. दोघांच्या लग्नाची ही हिंट असल्याचं म्हटलं जात आहे.