Mia Khalifa Divorce: एक्स पॉर्न स्टार लवकरचं घेणार घटस्फोट
`आयुष्याचं हे पुस्तक आता बंद करत आहे....`
मुंबई : एक्स पॉर्न स्टार मिया खलीफा लवकरचं पती रॉबर्ट सँडबर्गसोबत घटस्फोट घेणार आहे. मियाने इंस्टाग्रामवर घटस्फोट घेणार असल्याची पोस्ट शेअर केली आहे. 2019 साली मियाने बॉयफ्रेन्डसोबत साखरपुडा केला. त्यानंतर लॉकडाऊन दरम्यान त्यांनी लग्न केलं. पण आता नुकताचं लग्नाला एक वर्ष झाल्यानंतर मिया आणि रॉबर्ट यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. नात्याला टिकण्यासाठी भरपूर प्रयत्न केला असं देखील मियाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगतं आहे हे लग्न टिकवण्यासाठी मी प्रचंड प्रयत्न केले. पण एक वर्षांची थेरपी आणि प्रयत्नांनंतर आमच्या दोघांचे मार्ग आता वेगळे झाले आहेत. आम्ही कायम एकमेकांवर प्रेम करू आणि एकमेकांचा आदर करू. या एका घटनेचा आमच्या मैत्रीच्या नात्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होवू शकत नाही.'
पुढे मिया म्हणाली, 'आयुष्याचं हे पुस्तक आता बंद करत आहोत आणि पुढच्या प्रवासाची सुरूवात करणार आहोत. डॉग्स, कुटुंब आणि मित्रांमुळे आम्ही एकमेकांसोबत जोडलेले राहू.' महत्त्वाचं म्हणजे रॉबर्ट आणि मियाने पोस्टवरील कमेन्ट बॉक्स ऑफ करून ठेवले आहेत. सध्या मियाची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.