Shahid Kapoor : अभिनेता शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत नुकतेच मुंबईतील एका ब्यूटी कार्यक्रमात पोहोचले होते. तिथे शाहिद कपूरच्या पत्नीचे फोटोशूट सुरु होते. अशातच फोटोग्राफरला पाहून शाहिद कपूरला देखील पत्नीचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. त्याने देखील आपला स्वत: चा फोन काढला आणि पत्नीचे फोटो काढू लागला. परंतु हे फोटोशूट सुरु असताना सर्वांचे लक्ष शाहिद कपूर नाही तर तिथे मागे असणाऱ्या करीना कपूरच्या फोटोवर होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, शाहिद कपूरचा पत्नीचा फोटो काढतानाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी शाहिद कपूरचे कौतुक देखील केलं आहे. 


शाहिद कपूरच्या व्हिडीओमध्ये काय? 


शाहिद कपूरच्या व्हायरल व्हिडीओमध्ये अनेक फोटोग्राफर दिसत आहे. मुंबईत ब्यूटी कार्यक्रमासाठी शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत पोहोचले होते. त्यावेळी शाहित कपूरची पत्नी फोटोशूटसाठी वेगवेगळ्या पोज देत होती. त्यावेळी पती शाहिद कपूर देखील आपल्या पत्नीचे फोटो त्याच्या फोनमध्ये काढत होता. हे पाहून तेथील चाहत्यांना देखील आनंद झाला. हे सुरु असतानाच सर्वांची नजर तिथे असणाऱ्या मागच्या फोटोवर गेली. ज्यामध्ये करीना कपूरचा फोटो लावला होता. त्यानंतर चाहत्यांच्या नजरा सर्व त्या फोटोंवर गेल्या. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मीडियावर चाहत्यांनी शाहिद कपूरच्या या व्हायरल व्हिडीओ अनेक कमेंट्स केल्या आहेत. ज्यामध्ये चाहत्यांनी म्हटलं आहे की, एकीकडे बायको तर दुसरीकडे एक्स गर्लफ्रेंड. त्यासोबत चाहत्यांना त्यांचे जुने चित्रपट देखील आठवले. चाहत्यांना दोघांची जोडी प्रचंड आवडली होती. दोघांनी 'जब वी मेट' चित्रपटात कामं केलं आहे. ज्यामध्ये दोघांची कॉमेडी बघायला मिळाली. 


करीना कपूर आणि शाहिद कपूर ब्रेकअप


ब्रेकअपनंतर शाहिद कपूर आणि करीना कपूर दोघेही आपल्या आयुष्यात पुढे चालले आहेत. करीना कपूरने 2012 मध्ये सैफ अली  खानसोबत लग्न केले. त्यांना दोन मुलं आहेत. ज्यांची नावे तैमूरआणि जहांगीर आहेत. तर दुसरीकडे शाहिद कपूरने 2015 मध्ये मीरा राजपूतसोबत लग्न केले. त्यांना देखील दोन मुलं आहेत. ज्यांची नावे मिशा आणि जैन अशी आहेत.