मुंबई : अभिनेता आमिर खान आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर चाहते बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टला खूप शुभेच्छा आणि प्रेम देत आहेत. त्याचबरोबर, आमिर खानने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, त्याची एक्स पत्नी किरण रावने त्याला या वाढदिवसानिमित्त सर्वोत्तम भेट दिली आहे. आमिरने सांगितलं की नुकतंच किरणशी त्याचं बोलणं झालं होतं, ज्यामध्ये तिने त्याला त्याच्या कमतरता आणि कमकुवतपणाची यादी तयार करण्यास सांगितलं, जेणेकरून तो त्यावर काम करू शकेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिरने सांगितलं की, किरणने मला 10 ते 12 पॉइंट दिले. माझ्या आयुष्यातील वाढदिवसाची ही सर्वोत्तम भेट होती. आमिरने सांगितलं की, असे अनेक मुद्दे होते, ज्याने त्याला आश्चर्य वाटलं. किरणने प्रामाणिकपणे आणि प्रेमाने माझ्यातील कमतरता सांगितल्या. हे इतर कोणीही मला सांगू शकत नाही.


गेल्यावर्षी या कपलने घटस्फोट घेत सगळ्यांना आश्चर्यचकित केलं. १५ वर्षानंतर या जोडीने वेगळा होण्याचा निर्णय घेतला. यावेळी अमिरने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत ही माहिती दिली होी. ज्यामध्ये लिहीलं होतं की, आम्ही काही वेळापुर्वीच एकमेकांपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे.


आणि आता याला औपचारिक रुप देऊ ईश्चितो. वेगळं झाल्यावरही आम्ही एका परिवारासारखे राहू. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, आमिर खान लवकरच लाल सिंह चढ्ढा सिनेमात झळकणार आहे. अमिरसोबतच करिना कपूर आणि नागा चैतन्य या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.