पाकिस्तान वगळता सर्वत्र रिलीज होणार `मर्द को दर्द नही होता`
तैवानमधल्या ५५ चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : उरी-द सर्जिकल स्ट्राइकच्या प्रचंड यशानंतर, आरएसव्हीपीचा नुकताच प्रदर्शित झालेला 'मर्द को दर्द नहीं होता' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रशंसा मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 'मर्द को दर्द नही होता' या चित्रपटाची चर्चा होती. भारतात प्रदर्शित झाल्यानंतर आता चित्रपट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, तैवान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, दक्षिण अफ्रीका, जापान या देशांसोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्यात येत आहे .
आरएसव्हीपीचा चित्रपट तैवानमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होणार आहे. तैवानमधल्या ५५ चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये हा सिनेमा चीन आणि यूएसएमध्येही प्रदर्शित करण्यात येईल. "मर्द को दर्द नहीं होता" या चित्रपटाने 'टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव'मध्ये जागतिक प्रशंसा मिळवल्यानंतर केल्यानंतर भारतातल्या लोकांची मन जिंकले आहेत.
आरएसव्हीपी यांच्या "मर्द को दर्द नहीं होता" चित्रपटाला वैश्विक मान्यता मिळाली. जगभरातील कौतुकाने चित्रपटाचा अगोदर पासूनच प्रभाव होताचा, तसेच चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच भारतीय प्रेक्षकांकडून खूप प्रशंसा मिळाली होती.
अभिमन्यू दासानी, राधिका मदान, गुलशन देवैया, महेश मांजरेकर आणि जिमित त्रिवेदीने अभिनित हा चित्रपट प्रेक्षकांना अॅक्शन आणि कॉमेडीच्या मिश्रणासह मनोरंजनाचा आनंद देत आहे. या चित्रपटातून अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
'मर्द को दर्द नही होता' ही अशा व्यक्तीची कहाणी आहे, ज्याला कधीच वेदना होत नाहीत. लहानपणी ज्या गोष्टीचा त्रास व्हायचा, त्याच गोष्टीला त्याने मोठेपणी ताकद बनवली असल्याची ही गोष्ट आहे. वसन बाला दिग्दर्शित 'मर्द को दर्द नही होता' चित्रपट २१ मार्च २०१९ रोजी प्रदर्शित झाला आहे.